महाशिवरात्री माहापर्व श्री हत्राळेश्वर दरबारी मोठ्या उत्साहात साजरा
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील हञाळ येथे श्री हत्राळेश्वर दरबारी शिवराञी महापर्व मोठ्या उत्साहात साजरा केला महादेवाला रोज एक तास पंचामृताने स्नान घालण्यात आला 9 दिवस शिव नवरात्री उत्सव साजरा केला जगभरात आदिमायेची नवरात्री साजरी केली जाते पण शिवाची नवरात्री नऊ दिवस साजरी केली महादेवाचे नऊ दिवस नऊ शृंगार केले रोज महाआरती केली गेली महादेवाला रोज हळद लावली गेली शिवरात्रिला जगातील पहिला व अद्भुत विवाह शिव पार्वती विवाह झाला होता त्यामुळे शिवाला रोज हळद लावली शिवरात्रीच्या दिवशी दिपोत्सव दिप प्रज्वलीत करुन साजरी केली दिवसभर दुधाच स्नान महादेवाला करण्यात आले व शिवलीलामृत पारायण करण्यात आल शिव नवरात्री शृंगार - दिवस पहीला - शेषनाग शृंगार
दिवस दूसरा-घटाटोप शृंगार
दिवस तिसरा -छबीना शृंगार
दिवस चौथा-होल्कर शृंगार
दिवस पाचवा- मनमहेश शृंगार
दिवस सहावा -उमामहेश शृंगार
दिवस सातवा-वस्त्रधारण शृंगार
दिवस आठवा-शिवतांडव शृंगार
महाशिवरात्री महाकाल बने दूल्हा महादेव पार्वती विवाह करण्यात आला व महाशिवरात्री हत्राळेश्वर दरबारी मोठ्या उत्साहात साजरी केली.