महाराष्ट्र
रक्तदान ही काळाची गरज - जि. प.सदस्य राहुल राजळे
By Admin
रक्तदान ही काळाची गरज - जि. प.सदस्य राहुल राजळे
पाथर्डी- प्रतिनिधी
सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण खूप वाढलेले आहे, अनेक लोकांना वेळेला रक्त न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागतो त्यामुळे रक्त संकलन करणे आवश्यक आहे.
श्रीराम प्रतिष्ठान व स्व.मा.आ.राजीवजी राजळे मित्र मंडळ यांनी आज रक्तदान शिबिर आयोजित करून समाजाच्या हिताचे व स्व.राजाभाऊंना नेहमी अभिप्रेत असलेले कार्य केले याचा अभिमान वाटत आहे.
स्व.मा.आ.राजीवजी राजळे यांच्या ५३ व्या जयंतीनिमित्त श्रीराम प्रतिष्ठान व स्व.मा.आ. राजीवजी राजळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी राहुल राजळे यांनी मत मांडले.
या प्रसंगी डॉ.निलेश म्हस्के, डॉ.वसंत झेंडे, डॉ.विलास मढीकर तसेच वृ.स.सा.का. चे संचालक रामकिसन आबा काकडे, सुभाष अण्णा ताठे, श्रीकांत मिसाळ, बाळासाहेब गोल्हार,काकासाहेब शिंदे, बाबासाहेब किलबिले तसेच चारुदत्त वाघ,प्राचार्य टेमकर सर, कासोळे सर,बाळासाहेब ताठे सर, वसंतराव भगत,सचिन नेहुल, डी.व्ही.म्हस्के सर,अंकुश दादा राजळे,सुधीर शिंगवी,विनायक म्हस्के,संभाजी राजळे, आप्पासाहेब राजळे,अविनाश राजळे ,प्रमोद म्हस्के,न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथ नगर सर्व स्टाफ उपस्थित होते.
सदर शिबिर जन कल्याण रक्तपेढी अहमदनगर यांच्या संयोजनातून पार पडले .महिला प्रतिनिधी प्राध्यापिका धनश्री काजळे यांनी देखील रक्तदान करून महिलांचे प्रतिनिधित्व केले या शिबिरामध्ये ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी रामेश्वर राजळे ,सुनील मरकड , प्रवीण तुपे ,रमेश भुसारी ,नामदेव राजळे, रंगनाथ चितळे ,अमित भगत ,रामेश्वर पवळे, मंगेश भगत, संदीप नेहूल, सूर्यकांत कवळे, गणेश म्हस्के,अनिल खरड,गणेश काकडे,सचिन शेरकर ,अजय राजळे ,अंकुश जगताप ,अरुण राजळे ,युवराज मरकड ,अशोक पवार ,सुनील कवळे,भागवत खरड,सचिन राजळे,अमोल राजळे, बाळासाहेब म्हस्के,कैलास गिरी प्रमोद राजळे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी कासार पिंपळगावच्या आदर्श सरपंच मा.सौ. मोनाली ताई राहुल राजळे यांच्या हस्ते जन कल्याण रक्त पेढी अहमदनगर चे डॉ.झेंडे,डॉ. मढीकर, धामणकर मॅडम,तरटे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.
Tags :
7756
10