सुसरे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथे 11 कोटी 61 लक्ष रुपयांच्या विविध कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा शेवगाव पाथर्डी च्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे यांच्या हस्ते पार पडला. गावातील तुळजाभवानी मंदिर परिसर विकास कामांचे लोकार्पण 99 लक्ष रु, पांढरवस्ती पूल 4 कोटी रु.
आडनदी पूल पिंपळगाव रस्ता 3 कोटी रु.
गबरवस्ती पूल व रस्ता 3 कोटी 62 लक्ष रु.
अशा विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष डॉ मृत्यूंजय गर्जे, मंगलताई कोकाटे ,सरपंच दादासाहेब कंठाळी, ग्रामसेवक गणेश ढाकणे ,श्रीकांत मिसाळ, नानासाहेब कंठाळी,रामजी उदागे,शरद मिसाळ ,गणेश उदागे,दिपक पवार, मारुती मिसाळ , बाळकृष्ण कंठाळी, जगन्नाथ कंठाळी, महेश उदागे,काशिद मॅडम,जयश्री उदागे, आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.परिसरातील नागरिकांच्या रहदारीसाठी, कृषी मालाच्या, शेतीच्या कामाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची विकासकामे मार्गी लागल्याबद्दल गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.