हञाळ- सैदापूर येथे एक कोटी पाणी योजनेचा शुभारंभ
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील हत्राळ-सैदापुर या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या एक कोटी रुपयांच्या पाणी योजनेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
या योजनेमुळे हत्राळ आणि सैदापुर या दोन्ही गावाच्या प्रत्येक वाडी- वस्तीवर पाणी नळ कनेक्शन द्वारे मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. असे मोठे काम गावात कित्येक वर्षा नंतर झाले आहे. हत्राळ व सैदापुर हे गावे क्षेत्रफळाने मोठे असल्याने लोकाना पाणी पोहचणे शक्य नव्हते, तरी आता ते देखील शक्य होणार आहे, अशी माहिती या शुभारंभ प्रसंगी सैदापुरचे सरपंच आजिनाथ डोंगरे यांनी दिली.
या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेसाठी ग्रामस्थ रघुनाथ केदार यांनी जमीन दान देण्याची मोठे कार्य केले आहे.
या शुभारंभ प्रसंगी सैदापुरचे सरपंच आजिनाथ डोंगरे, हत्राळचे माजी सरपंच दादा शिवनकर, स्वस्त धान्य दुकानदार बबनराव केदार,उपसरपंच सुखदेव केदार,ग्रा.पं.सदस्य रेवनाथ केदार, ग्रामसेविका गोसावी मॅडम,वसंत पाटील केदार, एकनाथ कारभारी केदार,राजीव केदार,परमेश्वर टकले,पवन शिवणकर,भाऊराव केदार,हरीभाऊ केदार,बाबासाहेब दराडे,संभाजी केदार आदींची उपस्थिती होती.
हे काम सुरु झाल्याने ग्रामस्थाने समाधान व्यक्त केले आहे.