महाराष्ट्र
45233
10
राजळे महाविद्यालयात 'लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'
By Admin
राजळे महाविद्यालयात 'लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील श्री दादा पाटील राजळे शिक्षण संस्थेचे- दादा पाटील राजळे कला आणि विज्ञान महाविद्यालय आदिनाथनगर, तालुका: पाथर्डी, जिल्हा: अहमदनगर येथे वाणिज्य शाखा आणि अर्थशास्त्र पदवी व पदवीव्युत्तर विभाग प्रमुख म्हणून शैक्षणिक वर्ष १९९१ पासून कार्यरत असलेले मा. डॉ. सुभाष जगन्नाथ देशमुख यांना अर्थशास्त्र विषयाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य, ८१ संशोधन लेख राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित; अर्थशास्त्र विषयतज्ञ, ७ पुस्तकांचे प्रकाशन, विविध वाद- विवाद व वक्तृत्व स्पर्धांचे परीक्षण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्रांना साधन व्यक्ती, १५ पुरस्कार प्राप्त, सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवांमध्ये प्रमुख पाहुणा किंवा वक्ता, महाविद्यालय स्तरावर माहिती अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व संयोजक, ग्रंथालय सल्लागार समिती अध्यक्ष, शेतकऱ्यांच्या जमिनीचे अचूक मापन आपसातील वाद दूर करणारा, तसेच मागील 19 वर्षांपासून प्रजासत्ताक दिनी माजी सैनिक सत्कार सोहळ्यांचे आयोजक, सामाजिक शास्त्र मंडळ अध्यक्ष, प्रवेश तसेच परीक्षा समिती प्रमुख, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतावर स्प्रिंकलरचा संच जोडणी प्रशिक्षक, विविध मेळाव्यांचे आयोजन, विद्यार्थ्यांची शिक्षणाबरोबरच शेतीशी नाळ जोडणारा, हाडाचा शिक्षक, सर्व रोग निदान आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन, समाजाभिमुख कार्य करणारा, विद्यार्थी प्रिय शिक्षक, २ पेटंट, विविध सामाजिक संस्थांचे कायम सदस्यत्व, कासार पिंपळगाव ग्रामपंचायत आयोजित स्वच्छता अभियानाचे अध्यक्ष काळात ग्रामपंचायतला रोख रक्कम रुपये 35000 पुरस्कार स्वरूप मिळवून देणारा, अनेक माजी विद्यार्थ्यांना राजकीय, सार्वजनिक सहकारी व खाजगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणारा स्रोत, ऑनलाइन प्रश्नमंजुषांचे आयोजक म्हणून कार्यरत असल्याने त्यांना 'लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस' या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांना फोटोफ्रेम स्वरूपातील सन्मानपत्र, ट्रॉफी आणि मेडल,शाल, श्रीफळ, कमळ पुष्प देऊन दादा पाटील राजळे शिक्षण संस्थेचे सचिव माननीय जे. आर. महाजन, मार्गदर्शक माननीय जे. आर. पवार,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजधर ज. टेमकर, नॅक समन्वयक डॉक्टर राजू घोलप, कला शाखाप्रमुख डॉक्टर मेहबूब तांबोळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
माननीय आमदार मोनिकाताई राजळे, माननीय श्री राहुल राजळे, आदींनी मनस्वी अभिनंदन केले .
यावेळी आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव माननीय भास्कर गोरे, विज्ञान शाखा प्रमुख डॉक्टर जनार्दन नेहुल, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक चंद्रकांत पानसरे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख श्रीमती साधना म्हस्के, श्रीमती निर्मला काकडे,
श्रीमती अर्चना नवले, श्रीमती रामेश्वरी सरोदे, श्रीमती स्वाती सातपुते, श्रीमती कविता वीर, प्राध्यापक देविदास खेडेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील पालक, आजी तसेच माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आदींनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
Tags :
45233
10





