महाराष्ट्र
13136
10
जुनी पेन्शनसाठी राज्यव्यापी संपात प्रहार शिक्षक संघटना सहभागी होणार
By Admin
जुनी पेन्शनसाठी राज्यव्यापी संपात प्रहार शिक्षक संघटना सहभागी होणार- विजय देठे
पाथर्डी- प्रतिनिधी
राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याच्या मागणीसाठी १४ मार्च रोजी राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात आला आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनाही सरसावली असून संघटनेचे सर्व सदस्य या संपात सक्रिय सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय देठे यांनी दिली.
यावेळी देठे म्हणाले, राज्य सरकारी- निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे, या मागणीसाठी दि. १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप केला जाणार आहे. प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी यांची सदरील कर्मचारी हिताच्या व अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बैठक होऊन या बैठकीत सर्व संमतीने संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सदर बेमुदत संपात प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा अहमदनगर सक्रिय सहभागी होत आहे.
शेजारील पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश राज्य सरकार जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असतांना महाराष्ट्रातील राज्य सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ज्यातून राज्यातील कर्मचाऱ्यांना शासनावरील विश्वास उडत जाऊन शासनाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत शासन राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करत नाही, तोपर्यंत दि. १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा अहमदनगर यांनी घेतला आहे. सदर संपात प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा अहमदनगर सक्रिय सहभागी होत आहे.
या प्रसंगी कार्याध्यक्ष अनिल विधाते, सचिव मिलिंद अंत्रे, कोषाध्यक्ष सतिशकुमार भोसले, किरण खरात, उपाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, अजित गाडेकर, संघटक निलेश तिजोरे, प्रकाश जंबे, सहसचिव आनंद खरोटे, अनंत गोरे, वैशाली साळवे, भागवत घुले, संपर्कप्रमुख सचिन शेरकर, प्रसिद्धीप्रमुख श्रीहरी तांबडे, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
Tags :
13136
10





