न्यू गोल्डन क्रिकेट कल्ब टेनिस बाॕल क्रिकेट स्पर्धा सुरू
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथे न्यू गोल्डन क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओव्हर आर्म टेनिस बाॕल क्रिकेट व दादा गृप चषक स्पर्धेचे उद्घाटन (दि.08) करण्यात आले आहे.
यावेळी उद्घाटन प्रसंगी
दादा गृपचे संस्थापक विकी डुकरे, सिद्धेश्वर आडोळे, भरवीर-कवडदरा गृप ग्रामपंचायत सरपंच अश्विनी भोईर,माजी सरपंच बंडु काठे,तानाजी शिंगाडे,अमोलराजे म्हस्के,एकनाथ शिंदे तसेच क्रिकेट संघ व कोच तसेच परीसरातील क्रिकेट संघ,ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी हार,पुजा,श्रीफळ फोडून पुजा करण्यात आली.
या स्पर्धेसाठी परीसरातील अनेक गावातील क्रिकेट संघानी नोंदणी केली असून कार्यक्रम व स्पर्धा नियोजन अनिल निसरड यांनी केले आहे.
होणारे सर्व सामने चार षटकाचे खेळवले जातील.व एका पोलला दहा संघ खेळवले जाणार आहेत.ग्रामीण भागातील खेळाडूना जास्तीत जास्त सहभागी करुन घेतले जाईल.असे संयोजक निसरड यांनी सांगितले.
यामध्ये यशस्वी तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघासाठी विशेष टाॕर्फी देवून सन्मान होणार असून प्रथम क्रमांक मिळवणा-या संघासाठी 21000 रुपये, द्वितीय संघास 16000 रु. व तृतीय संघासाठी 7000 रु. बक्षिस तसेच उत्कृष्ट फलदांज,उत्कृष्ट गोलदांज,उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंचा बक्षिसे देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी दादा गृपचे संस्थापक अध्यक्ष विकी डुकरे,सिद्धेश्वर आडोळे, मा.सरपंच बंडु काठे, मिनानाथ साबळे, मच्छिंद्र कोरडे,नवनाथ बांडे, निनावी ग्रामपंचायत सरपंच गणेश टोचे, भाऊराव रोंगटे,अमोलराजे म्हस्के,वाल्मिक तारडे,उद्धव रोंगटे,शिवा रोंगटे,शंकर गाढवे यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.