महाराष्ट्र
10296
10
७७ वा स्वातंत्र्य दिनानिम्मित विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,भाषणातून केला भारत मातेचा जयघोष
By Admin
७७ वा स्वातंत्र्य दिनानिम्मित विद्यार्थ्यांनी
देशभक्तीपर गीत,भाषणातून केला भारत मातेचा जयघोष
नाशिक - प्रतिनिधी
भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात
७७ वा स्वातंत्र्य दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव तसेच ७६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी गावातून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत भारत माता की जय , जय जवान जय किसान, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.विद्यालयात राष्ट्रीय झेंडा ध्वजारोहण मा.श्री. धनुभाऊ रोंगटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय झेंडा यास सलामी देण्यात आली.राष्ट्रगीत,ध्वजगीत झाले.
यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, तसेच स्वातंत्र्य दिनानिम्मित भाषण मनोगत व्यक्त केले.
७७ वा स्वातंत्र्य दिनानिम्मित विद्यार्थ्यांनी
देशभक्तीपर गीत,भाषणातून भारत मातेचा जयघोष
यावेळी विद्यार्थ्यांनी चांगले मनोगत व्यक्त केल्याबद्दल जि.प.शाळा स्कूल कमिटी अध्यक्ष भुषण डामसे तसेच इतर ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत बक्षिस दिले.यावेळी गावातील भरवीर खुर्द-कवडदरा ग्रामपंचायत कार्यालय तसेच ज्येष्ठ नागरिक श्री. काशिनाथ दत्तू रोंगटे
,श्री.बळीराम रोंगटे,श्री.रामू रोंगटे
यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना चाॕकलेट,गोळ्या वाटप करण्यात आल्या
कार्यक्रम प्रसंगी
यावेळी अग्नीशामन विकास सेवा समृद्धी महामार्ग अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.तसेच विद्यालयाचे प्राचार्य व्हि.एम.कांबळे सर, ज्येष्ठ नागरिक श्री. किसन भाऊराव रोंगटे,भाजप तालुका उपाध्यक्ष श्री. हनुमंता निसरड,
जि.प.शाळा स्कूल कमिटी अध्यक्ष भूषण डामसे,
पोलिस पाटील प्रकाश रोंगटे,तानाजी शिंगाडे, कोंडाजी भोईर,
नरसिंगराव बनसोडे,अशोक पंडीत,
धनजंय डामसे,काशिनाथ रोंगटे,पांडुरंग निसरड,बी.एल.रोंगटे,ज्ञानेश्वर रोंगटे,किशोर रोंगटे,सागर रोंगटे,भाऊराव खोकले,किसन लक्ष्मण रोंगटे,भिमा रोंगटे,विष्णू निसरड,रामू रोंगटे, तसेच माजी विद्यार्थी,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,नन्नी कली महिला सदस्य, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
Tags :
10296
10





