श्री क्षेत्र मायंबा विठ्ठल रुक्माई संस्थानात अखंड हरिनाम सप्ताह सुरू
By Admin
श्री क्षेत्र मायंबा विठ्ठल रुक्माई संस्थानात अखंड हरिनाम सप्ताह सुरू
भालगाव येथील हरिनाम सप्ताहाची ३५ वर्षाची परंपरा आजही कायम
पाथर्डी प्रतिनिधी:
श्री क्षेत्र मायंबा विठ्ठल रुक्माई संस्थान भालगाव येथील सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह श्री ह. भ. प. न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री भगवानगड यांच्या अध्यक्षतेखाली आणि ह. भ. प. महंत निगमानंद महाराज मच्छिंद्रनाथगड निमगाव यांच्या कृपा आशीर्वादाने, ह.भ.प. महंत नवनाथ महाराज शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनाने पुष्प वृष्टीसाठी श्री क्षेत्र भगवान गडाचे प्रतिनिधी म्हणून श्री. ह. भ. प. नारायण महाराज शास्त्री यांच्या हस्ते फुले टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी श्रीक्षेत्र ब्रम्हनाथ संस्थान येळंबचे महंत ह. भ. प. रामेश्वर महाराज शास्त्री व क्षेत्र सालसिद्ध बाबा संस्थान मिडसांगवीचे ह. भ. प. हनुमंत महाराज शास्त्री, श्री क्षेत्र भगवान बाबा संस्थान तागडगावचे महंत ह. भ. प. अतुल महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत फुले टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला व अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झाली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने संत महंताची गावातून भव्य अशी मिरवणूक करून स्वागत करण्यात आले.
श्री क्षेत्र मायंबा विठ्ठल रुक्माई संस्थान भालगाव यांच्या ३५ वा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह गडावर १४ एप्रिल रोजी सुरू झाला असून सप्ताहाची दैनिक कार्यक्रमाची रूपरेषा दररोज पहाटे काकडा, विष्णुसहस्रनाम, गीता पाठ व ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ०९ ते ११ तुकाराम महाराज गाथा भजन, रामायण कथा, ज्ञानेश्वरी प्रवचन, हरिपाठ सायंकाळी भोजन, संगीत भजन रात्री ०९ ते ११ हरिकीर्तन व रात्री हरी जागर दि. १४ /०४ /२४ रोजी ह.भ.प. अमृत महाराज जोशी, दि. १५ /०४/ २४ रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे श्री क्षेत्र नेवासा, दि. १६ /०४/२०२४ रोजी ह. भ. प. भागवताचार्य केशव महाराज उखळीकर, दि.१७/०४/२०२४ रोजी दुपारी १० ते १२ ह. भ. प. कृष्णा महाराज शास्त्री, संध्याकाळी ह. भ. प. भरत महाराज जोगी परळी या सर्व महंताची कीर्तन सेवा संपन्न झाली.
आज दि. १८/ ४/२०२४ रोजी ह. भ. प. चांगदेव महाराज काकडे कंडारी व १९ /०४/२०२४ रोजी ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा, दि. २०/ ४ /२०२४ रोजी ह. भ. प. महंत विवेकानंद महाराज शास्त्री शिरूर कासार, रविवार दि.२१ /४/२४ रोजी सकाळी ११ ते १ श्री. ह. भ. प. नामदेव महाराज शास्त्री यांचे अमृततुल्य असे काल्याचे किर्तन होईल, त्यानंतर श्री सुरेश महादेव खेडकर गुरुजी व प्रभाकर महादेव खेडकर भालगाव यांच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल.
या कार्यक्रमांचा संपूर्ण भालगाव व भालगाव पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे ह. भ. प. महंत नवनाथ महाराज शास्त्री व समस्त गावकरी मंडळी यांनी आवाहन केले

