महाराष्ट्र
65726
10
एकता फाउंडेशनच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी प्रा.प्रकाश वाकळे
By Admin
एकता फाउंडेशनच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी प्रा.प्रकाश वाकळे यांची निवड
(पाथर्डी प्रतिनिधी ) बाळासाहेब कोठुळे
पैठण जि.छ.संभाजीनगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 'एकता फाउंडेशन कार्यकर्ता प्रशिक्षण' शिबीरामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक तसेच एम.जी.एम.विद्यापीठ, छ.संभाजीनगर चे माजी कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे, जेष्ठ कथाकार प्रा.डॉ.भास्कर बडे, एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिद्ध साहित्यिक मा.अनंतजी कराड, सचिव पत्रकार मा.गोकुळ पवार, प्राचार्य डॉ.रामकिशन दहिफळे, यांच्या हस्ते प्रा.प्रकाश वाकळे यांच्यावर एकता फाउंडेशनच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून यावेळी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
गेल्या तीन वर्षांपासून एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत असतांना प्रा.प्रकाश वाकळे यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत परभणी व आसपासच्या जिल्ह्यात एकता फाउंडेशनच्या कार्याचा जोरकसपणे प्रचार आणि प्रसार केला त्याची दखल घेत एकता कोअर कमिटीने प्रा.वाकळे यांची मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड केल्याचे एकता फाउंडेशनच्या उपाध्यक्ष मिरा दगडखैर, नितीन कैतके, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, सल्लागार ॲड.भाग्यश्री ढाकणे, सहसचिव लखुळ मुळे, महिला आघाडी प्रमुख रंजना फुंदे, संस्थापक सदस्य माही शेख, शिवचरित्रकार कैलास तुपे, राजेश बीडकर, फौजी कैलास खेडकर, व्यंगचित्रकार दिपक महाले, डाॅ.शोभा सानप, शोभा राजळे, रंजना डोळे, लता बडे, संध्या नागरे, जालिंदर तावरे, महादेव राऊत, पो.काॅ.ज्ञानेश्वर पोकळे, हरिप्रसाद गाडेकर यांनी जाहीर केले. या निवडीबद्दल प्रा.वाकळे यांचे एकताचे प्रदेश संघटक देवीदास शिंदे, युवक प्रदेश निमंत्रक इम्रान शेख, मराठवाडा विभागीय संघटक तथा दै.हाबाडाचे संपादक राजा पुजारी, परभणी जिल्हा महानगरीय अध्यक्षा प्रा.शोभाताई घुंगरे, जिल्हा उपाध्यक्षा प्रा.मेघा नांदखेडकर, नांदेड जिल्हाध्यक्षा प्रा.डॉ.संगीता घुगे, एकताचे जेष्ठ सहकारी प्रसिद्ध बालसाहित्यिक पु.ना.बारडकर, प्रा.मुरलीधर पंढरकर(हिंगोली), डॉ.धोंडोपंत मानवतकर(जालना), परभणी जिल्हा सचिव भास्कर बोडखे, जिल्हा संघटक चंद्रकात गाडे, प्रसिद्धी प्रमुख संपा.भुषणजी मोरे, रयत समाचारचे संपा.काॅम्रेड भैरवनाथ वाकळे, प्रा.नागेश जोशी आदींनी अभिनंदन केले आहे.
Tags :

