महाराष्ट्र
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख जाहीर; अहमदनगरमध्ये रंगणार आखाडा
By Admin
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख जाहीर; अहमदनगरमध्ये रंगणार आखाडा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
यंदाच्या प्रतिष्ठेच्या Maharashtra Kesari Wrestling Tournament महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या यजमानपदाचा मान अहमदनगर जिल्ह्याला मिळाला आहे.
अहमदनगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धा वाडियापार्क येथे २५ ते ३१ डिसेंबरमध्ये रंगणार आहेत. स्पर्धा आयाेजनाचे पत्र राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आमदार संग्राम जगताप यांनी स्वीकारले.
महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे अहमदनगर शाखेचे जिल्हाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन व्हावे, यासाठी राज्य संघटनेकडे पत्रव्यवहार केला होता. याचदरम्यान राज्य संघटनेने वाडियापार्क क्रीडा मैदानाची पाहणी केली होती.
मानाची गदा शरद पवार यांच्या हस्ते दिली जाणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचे पत्र आमदार जगताप यांना दिले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा शरद पवार यांच्या हस्ते दिली जाणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
ही स्पर्धा 25 ते 31 डिसेंबर दरम्यान वाडिया पार्क मैदानात खेळविली जाणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप व संयोजन सचिव संतोष भुजबळ यांनी दिली. राज्यातील अनेक जिल्हा संघटना या स्पर्धेच्या आयोजनासाठी उत्सुक होता, परंतु सर्व बाजूंनी विचार करता हा मान अहमदनगरला मिळाला. अहमदनगर जिल्हा आता दुसर्यांदा स्पर्धेचे आयोजन करणार आहे.
Maharashtra Kesari Wrestling Tournament महाराष्ट्र केसरीच्या गदेस अनन्यसाधारण असे महत्व असून या गदेला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1983 पासून मोहोळ कुटुंबीयांच्यावतीने महाराष्ट्र केसरीची गदा देण्यात येते. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 1961 साली सुरू झाली. तेव्हापासून चांदीची गदा विजेत्यास दिली जाते. 1982 पर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेमार्फत दिली जात असे. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र माजी खासदार अशोक (अण्णा) मोहोळ यांनी मामांच्या स्मरणार्थ 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली. गेल्या तीन
दशकांपेक्षा अधिक काळ मामासाहेब मोहोळ यांचे वंशज ही गदा स्वखर्चाने बनवून राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द करुन मामासाहेब मोहोळ यांच्या आठवणी जिवंत ठेवत आहे. आगामी 31 डिसेंबर रोजी चुरशीच्या अंतिम लढतीतून महाराष्ट्र केसरी ठरणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ही चांदीची गदा विजेत्याला प्रदान करण्यात येणार आहे.
Tags :
21504
10