महाराष्ट्र
धार्मिक स्थळावरून शिरपूरमध्ये तणाव
By Admin
धार्मिक स्थळावरून शिरपूरमध्ये तणाव
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथील धार्मिक स्थळावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पाथर्डीचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दोन्ही गटांतील प्रमुखांची बैठक घेऊन वाद सामोपचाराने मिटल्याने तणावाची स्थिती निवळली.
सोशल मीडियावरून तालुक्यातील शिरापूर व करडवाडी परिसरातील डोंगराच्या कुशीत दुर्गम ठिकाणी असलेले धार्मिक स्थळावर एका समाजाने दावा केला होता. तसेच परजिल्ह्यातून आयोजित केलेल्या धार्मिक सहलीने या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिस प्रशासनाने दोन्हीही गटांमधील प्रमुखांची बैठक घालत चर्चा घडवून आणली. त्यानंतर आपसातील वाद मिटवल्याने तणाव निवळला.रविवारी हा प्रकार घडला.
तालुक्यातील शिरापूर-करडवाडी परिसरातील डोंगराच्या कुशीत एक धार्मिक स्थळ आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने या ठिकाणी शक्यतो भाविक जात नाही. मात्र, या स्थळापासून अलीकडे असलेल्या तारकनाथाच्या धार्मिकस्थळी पोळ्याच्या दिवशी भाविक जात असतात. दुर्मिळ जागेत हे धार्मिक स्थळ असल्याने अनेकवेळा काही गुन्हेगार येथे जाऊन आश्रय घेतात. हे स्थळ आमच्या समाजाचे आहे, असा दावा करीत काही भाविक पुणे परिसरातून काल या स्थळाकडे जाण्यासाठी आले.
सोशल मीडियावर तसा संदेश सुद्धा प्रसारित झाल्याने या परिसरातील नागरिकांनी हे स्थळ आमचे आहे, असे सांगत विरोध सुरु केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यानंतर पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी पुढाकार घेत दोन्हीही समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेत आपसातील समज-गैरसमज दूर केल्याने हा वाद निवळला. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी पोलिस यंत्रणेने सायंकाळ पर्यंत सहायक पोलिस निरिक्षक प्रवीण पाटील, कौशल्यरामरंजन वाघ व सचिन लिमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
Tags :
19210
10