महाराष्ट्र
105013
10
कितीही खोटे गुन्हे दाखल करा कारखानदारानो माझा आवाज हा जनतेचा आवाज
By Admin
कितीही खोटे गुन्हे दाखल करा कारखानदारानो माझा आवाज हा जनतेचा आवाज आहे.- प्रा किसन चव्हाण
शेवगाव - प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील स्वाभिमानी नागरिक, महिला व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांची ढोल ताशांच्या गजरात तोफा व फटाक्यांची आतिषबाजी करून महापुरुषांच्या घोषणा देत भव्य मिरवणूक काढली.
प्रथम आखतवाडे येथील ग्रामदैवत भैरवनाथांचे दर्शन घेवून वंचित बहुजन आघाडीचे शाखा उद्घाटन करण्यात आले,त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांची घोंगडी बैठकीस सुरवात झाली.
यावेळी ग्रामस्थांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की,मी व माझे सहकारी कोणतीही सत्ता नसतांना तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध आहोत गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यातील जनतेला प्रस्थापित कारखानदारांनी वाऱ्यावर सोडून दिले मात्र आम्ही काय जनतेच्या प्रश्नासाठी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून सातत्याने जनतेचे प्रश्न समजून घेऊन संघर्ष करतो आणि त्यामुळेच शेवगाव पाथर्डी तालुक्यातील जनतेचा आम्हाला पाठींबा मिळतोय त्यामुळेच कारखानदार माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून माझा आवाज दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात पण मी त्यांना सांगू इच्छितो की माझा आवाज हा जनतेचा आवाज आहे तो तुम्ही दाबू शकत नाही ,या कारखानदारांनी सत्ता, पैसा, आणि जात हीच फक्त पात्रता आहे आता लोकसभा निवडणुका लागल्या बरोबर बिळातून बाहेर पडलेत पण जनता आता हुशार झाली आहे.
सुरुवातीला शाखा अध्यक्ष गणेश साळवे यांनी प्रास्ताविक केले याप्रसंगी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, संजय कांबळे,संजय साळवे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक साळवे यांनी केले तर गणेश साळवे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमास ढोरजळगाव शाखा अध्यक्ष सौरभ काकडे, उपसरपंच सुनील साळवे,शाहुल साळवे, सतिश साळवे, विशाल निकाळजे, युवा कार्यकर्ते सोहेल शेख,आकाश वाघमारे, नितीन बनकर, विकास वाघमारे,प्रमोद गजभिव, विकास गजभीव,आव्हाणे शाखा अध्यक्ष विष्णू वाघमारे, प्रमोद गजभीव,रज्जाक सैय्यद, अरविंद साळवे,सुमीत गजभीव,राजू मगर,, बाळासाहेब जगधने, संजय उगले रहीमभाई शेख,दादाभाई शेख रमेश फुलमाळी,सुभाष तुजारे बाबासाहेब बडे, प्रा किसन चव्हाण यांच्या घोंगडी बैठकीस पुण्याहुन प्रमोद निकाळजे उपस्थित होते यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला भगिनींचा सहभाग लक्षणीय होता.
विशेष -- प्रा किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक व विरोधकांनी लाईट घालवली तरीही अंधारात मिरवणूक स्वाभिमानी नागरिकांनी काढली
लाईट बंद करणे हे निर्लज्जनाचे लक्षण हे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील स्वाभिमानी नागरिकांनी ओळखले
Tags :
105013
10





