भगवान बाबांनी गावोगावी अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती केली सुखदेव तुपे
पाथर्डी- प्रतिनिधी
संत भगवान बाबा यांनी धार्मिक आणि सामाजिक कार्यात झोकून देऊन लोककल्याणासाठी पताका खांद्यावर घेतली. एक एकर जमीन विका, पण लेकरं शिकवा हा संदेश देऊन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. पशु हत्या बंद करून अंधश्रद्धा निर्मूलन विषयी जनजागृती गावोगावी जाऊन केली.अध्यात्माच्या साह्याने समाजातील अनिष्ट परंपरा बंद केल्या. शाकाहाराला प्रोत्साहन दिले. पुरुष समानता म्हणून स्त्रियांना सन्मान दिला, असे प्रतिपादन एकलव्य शिक्षण संस्थेचे समन्वयक सुखदेव तुपे यांनी केले.
शहरातील बी. डी . एस. विद्यालयात राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
भगवान बाबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजीवनी पानगे. अस्मा शेख, आशा गोला, संगीता धायतडक, बन्सी खेडकर संदीप खेडकर, गोपीनाथ गाले, सुभाष घुगे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे शिक्षक प्रा. जनार्धन बोडखे तर सूत्रसंचालन समृद्धी क्षिरसागर यांनी केले.आभार युवराज धायतडक यांनी मानले.