महाराष्ट्र
12439
10
वाघेश्वरी यात्रेनिमित्त वाघोली येथे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन
By Admin
वाघेश्वरी यात्रेनिमित्त वाघोली येथे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खा. सुजय विखे, आ. मोनिका राजळे यांची प्रमुख उपस्थिती
शेवगाव- प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे गुरुवार दि.६ रोजी वाघेश्वरी माता व जोडीचे हनुमान यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून लाखोंची बक्षिसे असलेल्या भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात केले होतें .
वाघोली येथील ग्रामदैवत वाघेश्वरी माता व जोडीचे हनुमान यात्रेनिमित्त गुरुवार दि.६ रोजी पैठण येथून आणलेल्या गंगेच्या पाण्याने वाघेश्वरी माता व जोडीचे हनुमान यांना जलाभिषेक घालण्यात आला दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी ७:३० वाजता छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात आली शुक्रवार दि.७ रोजी भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होतें यावेळी पुण्याचे महापौर पै.मुरलीधर मोहोळ,खा.सुजय विखे,आ. मोनिका राजळे, महाराष्ट्र केसरी पै.गुलाबराव बर्डे, पै.अशोक शिर्के, पै.युवराज पठारे,यांची प्रमुख उपस्थिती होती अ पै.बाबासाहेब रानगे ( कोल्हापूर) वि.अनिल लोणारे( वाघोली ) यांच्यामध्ये १ लाख रुपयांची मानाची कुस्ती तसेच पै.नागेश शिंदे( पुणे) वि.विजय डोंगरे ( बेलापूर) ५१ हजार रुपये,सागर कोल्हे ( शेवगाव) वि.अण्णा गायकवाड ( श्रीगोंदा)५१ हजार रुपये,मनोज फुले ( अहमदनगर) वि.सुरेश पालवे ( श्रीगोंदा) ४१०००/- रुपये, ओंकार पाटील (कोल्हापूर) वि.आकाश मलिक( दिल्ली)३१००० रुपये या प्रमुख कुस्त्यांसह प्रत्येकी अकरा हजार रुपयांच्या ५ मुख्य कुस्त्या व हजारो रुपये बक्षिसे असलेल्या अनेक कुस्त्या झाल्या राज्यभरातून नामांकित पहिलवान उपस्थित होतें तसेच शनिवार दि.८ रोजी सायंकाळी ७:३० वाजता सारेगम लावण्य बहार आर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतें अशी माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष तथा सरपंच उमेशराव भालसिंग यांनी दिली.
वाघेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील देवीच्या भाविकभक्तांनी आणि नागरिकांनी मनमुराद आनंद घेतला मिठाई रहाटपाळने खेळणे गृहउपयोगी वस्तु आणि ईतर करमणुकीचे साधने यांचा बालगोपाळ आणि महिला अबालवृद्धांनी मनमुराद आनंद घेतला
पुर्व नियोजित कार्यक्रम नर्तिका गौतमी पाटील न आल्याने अनेक|शौकिनांचा हिरमोड झाला
Tags :
12439
10





