महाराष्ट्र
19740
10
आरक्षणच नाही तर शाळेतही जाणार नाही; शाळा सोडून
By Admin
आरक्षणच नाही तर शाळेतही जाणार नाही; शाळा सोडून विद्यार्थी उपोषणस्थळी
मराठा आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शाळा शिकुन तरी काय करणार?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मराठा आरक्षण मिळावे यासाठीची मागणी आता जोर धरू लागली असून आंदोलन देखील (Maratha Reservation) अधिक तिव्र होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. या आंदोलनात आता जिल्हा परिषद शाळांमधील ( ZP School) विद्यार्थी देखील उतरत असून आरक्षण नाही तर शाळेतही जाणार नाही.अशी भूमिका घेत विद्यार्थी उपोषणस्थळी पोहचले आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वाघाळा गावात लिंबा गटातील दहा- बारा गावचे मराठा समाज बांधव २५ ऑक्टोबर पासुन साखळी उपोषण करत आहेत. परभणी जिल्ह्यातील वाघाळा येथे उपोषण सुरू असल्याने या ठिकाणी मराठा आरक्षण समर्थनार्थ होत असलेल्या घोषणाबाजीने विद्यार्थी प्रेरीत होत आहेत. आज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी अचानक वर्गाबाहेर आल्याने शिक्षकांना काही कळलेच नाही. यावर बाहेर कुठे जाता असा प्रश्न शिक्षकांनी विचारताच चिमुकल्या विद्यार्थिनीने मन हेलाऊन टाकणारे उत्तर दिले. या विद्यार्थ्यांनी चक्क छत्रपती शिवरायांचे स्मारक गाठून या ठिकाणी बसलेल्या आंदोलनात जाऊन आरक्षण समर्थनार्थ घोषणाबाजी करत आज पासुन शाळेत न जाण्याचा निर्धार केला.
काय म्हणाले विद्याथीं
आम्हाला जर आरक्षण (Maratha Aarkshan) मिळणार नसेल तर आम्ही शाळा शिकुन तरी काय करणार? आमचे मायबाप राणात राबराब राबतात. आमच्यासह जगाला खायला घालतात. आम्ही मुलांनी खुप शिकावं मोठ्ठ व्हावं ही त्यांची इच्छा पण कितीही मार्क घेतले, तरी आम्ही घरीच राहातो. त्यापेक्षा शिक्षण न घेता त्यांच्यासोबत काम केलेलं बरं आम्ही शाळेतून चाललो. आम्ही नाय येणार आता हीउव्दिग्न प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी दिली आहे.
Tags :
19740
10





