महाराष्ट्र
84956
10
कोरडगाव येथे तुषार भाऊ वैद्य यांचा सत्कार सोहळा संपन्न
By Admin
कोरडगाव येथे तुषार भाऊ वैद्य यांचा सत्कार सोहळा संपन्न
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे भारतीय जनता पार्टी शेवगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय तुषार भाऊ वैद्य यांचा सत्कार सोहळा कोरडगाव ग्रामपंचायत व कोरडगाव ग्रामस्थांच्या वतीने राजे छत्रपती हायस्कूल कोरडगाव या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अरविंद भाऊ सोनटक्के कोरडगाव चे सरपंच वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रवींद्र उर्फ भोरू शेठ मस्के, वंचित बहुजन आघाडी महिला तालुका अध्यक्ष शेवगाव माननीय संगीता ताई ढवळे, भाजप ओबीसी सेल तालुका अध्यक्ष अशोक भाऊ गोरे खेरड्याचे सरपंच बाबासाहेब सांगळे, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ वाळके, छत्रपती हायस्कूलचे संस्थापक श्री शिवाजीराव बनसोडे, महात्मा फुले सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉ. धर्मराज सुरवसे सर, शिवसेना युवा तालुकाप्रमुख श्री आकाश मस्के, बालमटाकळी ग्रामपंचायत सदस्य श्री दुर्योधन जी काळे, श्री किरण पाथरकर, श्री बबन भाऊ मुखेकर, नानासाहेब जाधव, जगन्नाथ भाऊ गोरे, प्राध्यापक श्री टेकाळे सर, कानिफ भैया काकडे, विकास गोरे, हरिभाऊ बनसोडे,दिनेश साळुंखे, अश्फाक शेख, बाळासाहेब जाधव, गोविंद गोरे, चैतन्य गोरे,राम जाधव यांच्यासह कोरडगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते. श्री तुषार भाऊ वैद्य यांची सलग तिसऱ्यांदा भाजप तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे, स्व. शिवनाथ जी अण्णा वैद्य यांचा सामाजिक राजकीय वारसा त्यांना लाभलेला असून, बालमटाकळी ग्रामपंचायत चे सरपंच म्हणून पंधरा वर्षे त्यांनी चांगले काम केलेले आहे. त्यांच्या हातून जनतेची सेवा होत राहो अशा शुभेच्छा त्यांना दिल्या. माझ्यावर जनतेने आज पर्यंत भरभरून प्रेम केलेले आहे, स्वर्गवासी गोपीनाथ जी मुंडे, व स्वर्गवासी शिवनाथ अण्णा यांचे संस्कार लहानपणापासून माझ्यावर झालेले आहेत. वेगवेगळ्या राजकीय पदावर असताना सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन काम करत आहे. राजकारणात पैसा कमावणे हा उद्देश नसून सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत आहे, सत्कारातून माझी आणखी जबाबदारी वाढलेली आहे असे मत तुषार भाऊ वैद्य यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्वांनीच तुषार भाऊ यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Tags :
84956
10





