बाळासाहेब ढाकणे यांना राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार जाहीर
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगांव येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय शेतकरी युनीयन जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांना त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या समस्याला प्रभावीपणे सामाजीक बांधीलकीतून वाचा फोडल्याबद्दल बहुभाषीक भाऊ बाबा वंजारी संघ महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्षा लक्ष्मीताई गर्कळ यांनी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आहे.
सदरचा पुरस्कार वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार देण्यात येणार आहे.
शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांना राज्यस्थरीय समाजभुषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अहमदनगर दक्षिणचे खा. सुजय दादा विखे, पाथर्डी शेवगांवच्या आमदार मोनीका राजळे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, अँड. शिवाजीराव काकडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोकुळभाऊ दौंड, शेतकरी युनीयनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दिघोळे,राहुल शेठ कारखेले, नवनाथ खेडकर,सुरेशशेठ चोरडिया,हारी वायकर, उद्योजक बाबासाहेब ढाकणे , शिवसेना तालुका प्रमुख विष्णुपंत ढाकणे, शिवसेना ठाकरे गट प्रमुख भगवान दराडे, पागोरी पिंपळगांवच्या सरपंच छाया राजेंद्र दराडे, राजेंद्र गर्जे गुरुजी. माजी जि.प. सदस्य ज्ञानदेव केळगद्रे, माजी पं. सदस्य दत्तात्रय दराडे, खादी ग्राम उद्योगचे चेअरमन सुरेश नागरे, अनंतराजे कराड गुलाभाई शेख,प्रा.सुनील पाखरे, नागनाथ गर्जे, मुनीर पटेल, अंबादास लाड, लक्ष्मण गर्जे, मल्हारी कुटे.विष्णु साहेबराव दराडे, शौकत फकीर, विष्णु वाघमारे व परीसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.