महाराष्ट्र
9355
10
आ. बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाचा मंत्रिपदाचा दर्जा
By Admin
आ. बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाचा मंत्रिपदाचा दर्जा
दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवड
पाथर्डी- प्रतिनिधी
दिव्यांग कल्याण विभागाचा 'दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय दिव्यांगाच्या दारी' या लोककल्याणकारी उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून आमदार बच्चू कडू यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांना दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाचा मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. या संदर्भातील शासन निर्णय २३ मे रोजी निर्गमित करण्यात आल्याची माहिती दिव्यांग प्रहार संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी दिली.
दिव्यांगाच्या विविध कल्याणकारी योजना थेट दिव्यांगापर्यंत त्यांच्या दारी पोहोचविण्यासाठी शासन स्तरावरून दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय दिव्यांगाच्या दारी हा दिव्यांग कल्याणकारी उपक्रम ६ जून २०२३ रोजी पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवून दिव्यांग व्यक्तींशी संबंधित सर्व योजना या अभियान अंतर्गत शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अभियानाची प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी राज्यस्तरावर एक समिती गठीत करण्यात आली आहे. अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक व समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार बच्चू कडू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निर्देश वरून दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय व या अभियानासाठी मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला असून मंत्र्याच्या सर्व सोयी सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे निर्गमित झालेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
आमदार बच्चू कडू यांच्या निवडीबद्दल प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राजगुरू, अहमदनगर जिल्हाध्यक्ष विजय देठे तसेच पाथर्डी तालुका दिव्यांग प्रहार संघटनेचे संघटक मेजर कृष्णा दौंड, महिला उपाध्यक्षा आशाताई बेळगे, महिला कार्याध्यक्षा सुमित्राताई वेताळ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags :
9355
10





