पाथर्डीत माजी केंद्रीय राज्य मंञी,मा.खासदार दिलीप गांधी यांना सर्व पक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली
पाथर्डी - प्रतिनिधी
माजी केंद्रीय राज्यमंत्री व अहमदनगर दक्षिणेचे माजी खासदार स्व. दिलीपजी गांधी यांना पाथर्डीत तालुक्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. पाथर्डी येथील नाईक चौकामध्ये शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध कार्यकर्त्याकडून स्व. गांधी यांच्या जीवन प्रवास, राजकीय वाटचाल, त्याच्याशी असलेली मैत्री, काम करण्याची पद्धत, खासदार फंडातून केलेली विवध विकास कामे, पक्ष संघटनेतील योगदान आदि अनेक विषयावर कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या.
या शोकसभेस दिनकरराव पालवे, नाशीरभाई शेख, चांद मणियार, मिठूभाई शेख, किसन आव्हाड, प्रा. सुनील पाखरे, नागनाथ गर्जे, घेवरचंद भंडारी, शंकरराव रासने, महेश अंगारखे, बाळासाहेब ढाकणे, महेश दौंड, सुखदेव मर्दाने, सुनील बेळगे, बाळूशेठ छाजेड, संतोष दहिफळे, नवाबभाई शेख, शब्बीरभाई शेख, अशोक ढाकणे, हुमायून आतार, भानुदास गोरे, सूर्यभान गर्जे, संतोष जाधवर, कांतीलाल माळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.