नाभिक व्यवसायिकांचा दशक्रियासहीत धार्मिक कार्यक्रमांवर बहिष्काराचा इशारा
By Admin
नाभिक व्यवसायिकांचा दशक्रियासहीत धार्मिक कार्यक्रमांवर बहिष्काराचा इशारा
नगर सिटीझन live टिम-
सलून व्यवसाय करण्यास बंदी घातल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दशक्रिया विधीसह सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बहिष्कार टाकू.तसेच शासनाने २०,००० रुपयांची आर्थिक मदत करावी, अन्यथा रस्त्यावर उतरविण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्षा शांताराम राऊत,उत्तर विभागीय सरचिटणीस सुनिल वाघमारे,राज्य कार्य.सदस्य विकास मदने,जिल्हा सलून चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन वाघ, युवा जिल्हाध्यक्ष शरद दळवी, शहराध्यक्ष विशाल मदने आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या वर्षी लॉकडाऊन जसा सुरु झाला,ते व्हापासून महाराष्ट्रातील सलून व्यवसाय मोडकळीस आला आहे.सुरुवा तीच्या काळात आम्ही शासनाकडे बि हार,आंध्रप्रदेश,राज्यस्थान या राज्यामध्ये सलून व्यवसायाला ज् या प्रमाणात आर्थिक मदत करण्या त आली.त्याच धर्तीवर महाराष्ट् र शासनाने ही २०,०००रूपयांी आर् थिक मदत करावी.तसेच गाळा भाडे, लाईट बील माफ करण्यात यावे.यासा ठी नगर शहरामध्ये आमरण उपोषण करण्यात आले.त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरुपाचे आंदोलन झाले.नगर
शहरामध्ये आमरण उपोषण करण्यात आले.त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरुपाचे आंदोलन झाले.नगर येथील उपोषण ग् रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच आ.संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत स्थगि त करण्यात आले.याप्रसंगी पालकमं त्री यांनी दिलेल्या आश्वासना नुसार पहिल्या कॅबिनेटमध्ये समा जाचे प्रश्न सोडविले जातील.
योग्य तो आर्थिक मोबदला दिला जाईल,असे आश्वासन दिले.आज पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.सलून आणि ब्युटी पार्लर या संदर्भात आपण ३० एप्रिल पर्यंतची जी बंदची घोषणा केली आहे.त्याबाबत आपण नाभिक समाजावर एक प्रकारचा मोठा आघात केलेला आहे.आपण सर्व आस्थापनांना व गर्दी होणार्या ठिकाणांना काम करण्याची सकाळी आठ ते सायंकाळी सात पर्यंत सवलत दिलेली आहे. मग सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकच आपण टार्गेट करीत आहात.आमच्या सलूनमध्ये आम्ही गर्दी होऊ देत नाही व जवळून जरी काम करत असलो तरी सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून काम करतो.तसेच लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आम्ही आमचे व्यवसाय अतिशय काळजीपूर्वक,सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून करत आलेलो आहोत.आम्हालाही आमच्या जीवाची पर्वा आहे.सलून व्यववसायिक हा पोटावर हात असणारा आर्थिक परिस्थिती नाजूक असतांना रोजची गुजरण करत आहे.दिवसभरात केलेल्या कामावर तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतो.त्यात इतका मोठा बंद म्हटल्यानंतर त्यांच्या कुटूंबावर उपासमारी शिवाय किंवा आत्महत्याशिवाय पर्याय नाही.आम्ही व्यवसाय आठ दिवसांपर्यंत बंद ठेवणे सहाजिक आहे.हे संपूर्ण महिनाभर बंद ठेवणे म्हणजे आमच्यावर अन्याय आहे.त्यामुळे शासनाने प्रत्येक कारागीरास २०,०००
रूपये मानधन देण्यात यावे.तसेच आम्ही सलून दुकान बंद ठेवू अन्यथा येणार्या काळात आम्ही सहकुटूंब व सहपरिवार रस्त्यावर येऊ,असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर शिवाजी दळवी,अरुण वाघ,बापू क्षीरसागर, नासिर शेख,इम्रान शेख,अब्दुल रहेमान,सतीश साळूंके,अशोक खामकर,सुरेश राऊत,राजेंद्र ताकपेरे,दिपक बिडवे,बाळासाहेब शेजूळ,गणेश कदम,अजय कदम,सुनिल खंडागळे, संतोष वाघमारे आदिंसह सलून व्यवसायिकांच्या सह्या आहेत.