आमदार निलेश लंके यांचा नसून तो महाराष्ट्राचा सन्मान केंद्रीय मंत्री गडकरी
By Admin
आमदार निलेश लंके यांचा नसून तो महाराष्ट्राचा सन्मान- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नगर सिटीझन live team - प्रतिनिधी
महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ' या पुरस्काराचा वितरण सोहळा आज संपन्न झाला.
गेल्या वर्षभरात अनेक सामाजिक व राजकीय कामे केल्याच्याची दखल घेत महाराष्ट्रातून ठराविक व्यक्तींची निवड करण्यात आली त्यात राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्रातील एकमेव पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेशजी लंके यांचा समावेश झाला हे समस्त पारनेरकरांसाठी अभिमानास्पद आहे.
आ. लंके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर केलेल्या कामाची दखल घेत ' लोकमत' वृत्त समुहाच्या वतीने पुरस्कार आज ( मंगळवारी ) नवी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, 'लोकमत ' वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष व सर्व संचालक व अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीतीत पारनेरच्या भूमिपुत्रास अर्थात आ. निलेश लंके यांना हा सन्मान प्राप्त झाला.
यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की, हा सन्मान माझा नसून गेले कित्येक दिवस कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी वाडीवस्तीवर जात योगदान देणाऱ्या मला व माझ्या सामाजिक कार्यात सावलीसारखे माझ्या पाठीमागे राहणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांचा सन्मान आहे.असेही यावेळी आमदार निलेश लंके यांनी सांगीतले.
महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील एकमेव व्यक्ती म्हणजे आमदार निलेश लंके यांना राजधानी दिल्ली येथे खासदार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते तसेच राजेंद्र दर्डा, योगेश लखनो, ( ब्राईट आसूटे ) ऋषी दर्डा ,अखिलेश प्रसाद सिंग, खासदार प्रतापराव जाधव ,खासदार कुणाल तुमाणे संदीप सिंग (व्हाईस प्रेसिडेंट ), आ. निलेश लंके प्रतिष्ठानचे राज्य सचिव ऍड. राहूल झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा केला गेला.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, हा सन्मान एकटया आ.निलेश लंके यांचा नसून तो महाराष्ट्राचा सन्मान असल्याचे गौरोद्गार केंद्रीय मंत्री गडकरी यांनी काढले.
दरम्यान, पारनेरच्या भूमिपुत्राचा देशाच्या राजधानीत झालेल्या सन्मानाचा आनंद पारनेर - नगर विधानसभा मतदार संघातील जनतेला झाला आहे.