राष्ट्रवादी काँग्रेस पाथर्डी तालुकाध्यक्षपदी रणजीत बेळगे
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील वाळुंज येथील सामाजिक कार्यकर्ते रणजीत बेळगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) पाथर्डी तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. रणजीत बेळगे यांची पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी, प्रदेशपक्ष कार्यकारणी मान्यतेने नियुक्ती करण्यात आली आहे. तसे निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांच्याकडून देण्यात आले.
सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची विद्यमान स्थिती बिकट असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रभर सर्वसामान्यांचे मुद्दे उचलत असतो. व सर्वसामान्य, शेतकरी, युवकांना न्याय देण्याचे काम करतो. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष वाढीसाठी व पक्षाचे सर्व ध्येय धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक कार्यात व जनसामान्यात ओळखीचे असलेल्या लोकांना पक्षाची जबाबदारी दिली जात आहे. समाजकार्यात पुढे असणारे रणजीत बेळगे यांची राष्ट्रवादी पक्षाच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
रणजीत बेळगे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.