महाराष्ट्र
11-Jan-2025
प्रवरा विद्यालयाचा शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेत १००% निकाल
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील भूतेटाकळी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाचा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा अंतर्गत इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल १००% लागला असून सहा विद्यार्थी बी ग्रेड तर पाच विद्यार्थी सी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले.
विद्यालयाचे कलाशिक्षक श्री बंडोपंत गोडगे यांनी विशेष परिश्रम घेतले, त्याबद्दल मुख्याध्यापक आसिफ पठाण यांनी त्यांचे विद्यालयाच्या वतीने सत्कार केला.
याप्रसंगी संस्थेच्या शिक्षण विभागाच्या संचालिका सौ.लीलावती सरोदे यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले करून शुभेच्छा दिल्या.