महाराष्ट्र
91096
10
गीतकार एल. के. लक्ष्मीकांतच्या सुरेल आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
By Admin
गीतकार एल. के. लक्ष्मीकांतच्या सुरेल आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
३ हजार विद्यार्थ्यांचा जल्लोष करत गाण्याच्या तालावर ठेका
पाथर्डी प्रतिनिधी:
शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयाचा माजी विद्यार्थी गायक व संगीतकार लक्ष्मीकांत फुंदे जो सध्या मुंबई येथे तमिळ हिंदी डब सिनेमे व मराठी चित्रपट यात आघाडीचा गायक व संगीतकार म्हणून काम करत आहे.अचानकपणे त्याने विद्यालयाला भेट दिली असता, त्याचा भव्य सत्कार करण्यात आला.
या वेळी आयोजीत सत्कार समारोहात त्याने विद्यार्थ्यां समोर आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलतांना त्याने सांगितले की, इ .पाचवी ते बारावी पर्यंत मी या शाळेत शिकलो. शालेय जीवनात अभ्यासात फारसे लक्ष नव्हते परंतु संगीताची मात्र प्रचंड आवड होती. त्यावेळी शाहीर भारत गाडेकर सर यांनी माझ्यातील हे गुण हेरले व मला प्रोत्साहन दिले.त्या वेळी शाळेतील विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल कटारिया सर हे करत असत.त्यावेळी आपल्यालाही स्टेजवर असे बोलता येईल का? ही इच्छा सतत मनात निर्माण होत होती. त्यातूनच पुढे गाडेकर सरांनी विविध शालेय कार्यक्रमात गीत गायनाच्या संधी उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली. मला व्यासपीठ मिळाले व हाच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर मी पुण्याला गेलो तिथे होस्टेलला राहून साऊंड रेकॉर्डिंग या क्षेत्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. नंतर मुंबई येथे वेगवेगळ्या सिने कलावंत सोबत काम केले. माझ्या प्रवास खूप खडतर होता तरी सर्वांचे आशीर्वाद, माझ्या मनात असलेली प्रचंड जिद्द,आत्मविश्वास या बळावर माझे थिएटर ला गीत गायन,डिलिव्हरी बॉय चित्रपटासाठी गायन इ.बाबी माझ्या आयुष्यात आल्या व त्यामुळे मी धन्य झालो.परंतु या सर्व यशामध्ये या विद्यालयाचा वाटा हा फार मोठा आहे. त्यामुळे या विद्यालयाच्या प्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
या वेळी त्याने सर्वांच्या आग्रहाखातर त्याच्या अल्बम व चित्रपटातील मधील गाणी गायली. या वेळी तीन हजार विद्यार्थ्यांनी अक्षरशः त्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध होत जल्लोष करत त्या गाण्यावर ताल धरला. तसे पाहता लक्ष्मीकांत मुळचा ग्रामीण भागातील फुंदे टाकळीचा.परंतु केवळ जीवनात अतिशय खडतर प्रवास करून स्ट्रगल करून आज त्याने सिने सृष्टीत स्वतः ला सिद्ध केलेआहे . तमिळ सिनेमे जे हिंदी मध्ये डब होतात,त्या मधील दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत,महेश बाबूं यांचे साठी गाणी गायली. तसेच मराठी चित्रपट डिलिव्हरी बॉय या सिनेमाचे संगीतकार व गायन केले . त्यांचे गाजलेले अल्बम गॉडी तुझी लागली,लई गुणांची आहे,याला जवळपास १ करोड लोकांनी पाहिले आहे. बुलेट, इंतेजार,सब मोह माया है अश्या खूप सिनेमात संगीत दिले. या त्याच्या उत्तुंग यशाबद्दल त्याचा हा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता.
या संभारभा साठी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे, अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर विश्वस्त धरमचंद गुगळे ,राजेंद्र मुथा, प्राचार्य अशोक दौंड, उप मुख्याध्यापक विजयकुमार छाजेड ,पर्यवेक्षक दिलावर फकीर ,अजय भंडारी , विभाग प्रमुख सुधाकर सातपुते , नगरसेवक प्रसाद आव्हाड,आनंद गुगळे, गोपाल लाहोटी उपस्थित होते.
या वेळी अध्यक्षपदावरून बोलतांना सतिश गुगळे यांनी देखील लक्ष्मीकांत चे कौतुक केले. खडतर परिस्थितीवर मात करून त्याने मिळवलेले यश हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. जर शिक्षकांनी विद्यार्थ्यामधील सुप्त गुण हेरले व त्यास प्रोत्साहन दिले तर नक्कीच विद्यार्थ्याचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल यात तिळमात्र शंका नाही, असे यावेळी प्रतिपादन केले.
नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करतांना या विद्यालयामुळेच आम्ही सक्षमपणे यशस्वी झालो आहोत. म्हणून विदयालयाचे आभार व्यक्त केले व विद्यालयातील विविध उपक्रमांचे कौतुक देखील केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक जब्बारखान पठाण यांनी केले तर आभार शाहीर भारत गाडेकर यांनी मानले .
Tags :
91096
10





