महाराष्ट्र
9645
10
भगवान श्री मच्छिंद्रनाथ यात्रेनिमित्त भालगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ
By Admin
भगवान श्री मच्छिंद्रनाथ यात्रेनिमित्त भालगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील श्री क्षेत्र मायंबा विठ्ठल रुख्माई संस्थान येथे भगवान श्री मच्छिंद्रनाथ यात्रेनिमित्त व भगवान श्री मच्छिंद्रनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठा पंचम वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सालाबाद प्रमाणे श्री. ह. भ. प. न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री, भगवानगडकर यांच्या अध्यक्षतेखाली, वै. ह. भ. प. महंत निगमानंद महाराज, श्री मच्छिंद्रगड निमगाव यांच्या आशीर्वादाने व श्री. ह. भ. प. महंत नवनाथ महाराज शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दि. २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच श्री ह. भ. प. काशिनाथ महाराज शास्त्री भगवानगड यांचे श्रीमद् भागवत कथा २ ते ५ या वेळेत होणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान मंगळवार (दि. २८) श्री. ह.भ.प.अविनाश महाराज शास्त्री भगवानगड, बुधवार (दि.२९) श्री. ह. भ. प. लक्ष्मण महाराज पाटील श्री क्षेत्र आळंदी देवाची, गुरुवार (दि. ३०) रामनवमी निमित्त दुपारी १० ते १२ श्री. ह. भ. प. विवेकानंद शास्त्री महाराज , व रात्री श्री. ह. भ. प. रमेशानंदजी महाराज चेडगावकर, शुक्रवार (दि. ३१) श्री. ह. भ. प. ज्ञानेश्वर म. तांबे श्री क्षेत्र नेवासा, शनिवार (दि. १ एप्रिल) श्री. ह. भ. प. राम महाराज डोंगर जाटनांदुर, रविवार (दि.२) श्री. ह. भ. प. चांगदेव म. काकडे कंडारी, सोमवार (दि.३) श्री. ह. भ. प. हरिदास म. शास्त्री श्री क्षेत्र आळंदी देवाची यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम होऊन मंगळवार दि. ४ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत श्री. ह. भ. प. महंत नवनाथ महाराज शास्त्री, श्रीक्षेत्र मायंबा विठ्ठल रखुमाई संस्थान, भालगाव यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होऊन त्यानंतर श्री शिवनाथ त्रिंबक खेडकर व श्री नारायण महादेव खेडकर (सर) यांच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
दरम्यान सोमवार दि. ३ रोजी श्री. ह. भ. प. न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव शास्त्री, श्री क्षेत्र भगवानगडकर हे हरिनाम सप्ताह निमित्त सकाळी १०.०० वा. सदिच्छा भेट देणार असल्याचे संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले असून परिसरातील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ह. भ. प. नवनाथ महाराज शास्त्री व समस्त भालगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
Tags :
9645
10





