महाराष्ट्र
3698
10
आमदार मोनिका राजळें नेतृत्व ,शांत ,संयमी व विकासाची दृष्टी असलेली
By Admin
आमदार मोनिका राजळें नेतृत्व ,शांत ,संयमी व विकासाची दृष्टी असलेली - बबन तात्या मरकड
पाथर्डी- प्रतिनिधी
आमदार मोनिका राजळे यांचे गेल्या आठ-दहा वर्षातील कार्य विकास कामाचा मानबिंदू ठरत असून राज्यासह जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे . राजळेंचे नेतृत्व ,शांत ,संयमी व विकासाची दृष्टी असलेली असून तालुक्याने अशा नेतृत्वामागे ताकद उभी करण्याचे आव्हान मढी देवस्थान समितीचे अध्यक्ष बबन तात्या मरकड यांनी केली .
कानिफनाथ भक्त मंडळ, मढी ग्रामस्थांच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .यावेळी तालुक्यातील नेते कार्यकर्त्यांसह भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर , वृद्धेश्वरचे संचालक सुभाष ताठे , बाळासाहेब गोल्हार , नितीन एडके, प्रशांत शेळके, प्रसाद आव्हाड ,माजी सरपंच भगवान मरकड कानिफनाथ देवस्थानच्या सचिव विमलताई मरकड कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त डॉ . विलास मढीकर , रवींद्र आरोळे , शामराव मरकड ,नवनाथ मरकड आदी उपस्थित होते.
राज्यस्तरीय भाविक मंडळाकडून आमदार राजळे यांना अत्यंत मानाचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविल्यानंतर श्रीगोंदा ,शेवगाव ,नगर पाथर्डीतील समर्थकांनी राजळेचा कार्यक्रमास्थळी गौरव केला .
यावेळी बोलताना माजी अध्यक्ष नवनाथ मरकड म्हणाले राजळे कुटुंब तालुक्याची मोठी राजकीय शक्ती असून आगामी मंत्री मंडळ विस्तारात आमदार मोनिका राजळे यांना स्थान मिळावे यासाठी पक्षश्रेष्ठीकडे शिष्टमंडळ नेण्यात येईल .तालुक्याचा विकासात आमदार राजळे यांचे योगदान लक्ष विधी आहे . मढी देवस्थानसह तालुक्यातील सर्वच तीर्थक्षेत्रांना भरविनिधी मिळून देऊ विकासाची मुहूर्तमेढ रोवली .संपूर्ण तालुका आमदार राजळे यांच्या नेतृत्वाकडे मोठ्या आशेने पाहत असून राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने संपूर्ण तालुक्याची प्रतिष्ठा वाढली आहे . केंद्र व राज्य सरकरमध्ये असलेल्या वजन वापरून आमदारांनी धार्मिक पर्यटनावर लक्ष केंद्रित करून रोजगार निर्मितीला हातभार लावावा .
यावेळी बोलताना आमदार राजाळे म्हणाल्या राजकीय कारकीर्दीतील जीवनगौरव पुरस्कार प्रथमच मिळाल्याने आपली जबाबदारी वाढली आहे .पुरस्कार मिळण्या ऐवढे कार्य केले नाही . मात्र राज्यातील नाथ भक्ताकडून होणारे कौतुक संपूर्ण मतदारांचा मोठेपणा वाढवणारे ठरले आहे . विकास कामात प्रेरणा व पाडबळ मिळण्यासाठी कानिफनाथांच्या आशीर्वाद समजून हा पुरस्कार आपण संपूर्ण मतदारसंघ कार्यकर्ते व मनापासून साथ देणाऱ्या विकास दुताना अर्पण करीत आहोत .कार्यक्रमाची प्रास्ताविक माजी सरपंच भगवान मरकड सूत्रसंचालन डॉ . विलास मढीकर तर आभार रवीद्र अरोळे यांनी मांनले
Tags :

