महाराष्ट्र
गजेंद्रला पाहण्यासाठी गर्दी;दीड टन वजन, एक कोटी रुपये किंमत असलेला रेडा
By Admin
गजेंद्रला पाहण्यासाठी गर्दी;दीड टन वजन, एक कोटी रुपये किंमत असलेला रेडा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सहा फूट उंची, काळाभोर रंग, दीड टन वजनाचा गजेंद्र (रेडा) अहमदनगरच्या राहुरी येथील कृषी प्रदर्शनात आकर्षणाचं केंद्र बनला आहे. बेळगाव मधल्या विलास नाईक यांचा हा रेडा असून त्यांनी तो खास पंजाबमधून आणला आहे.
तो पाच वर्षांचा असून मुरा जातीचा आहे. या रेड्याला पाहण्यासाठी राहुरी आणि पंचक्रोशीतील शेतकरी गर्दी करत आहेत.
मालक विलास नाईक यांनी सांगितले की, गजेंद्रच्या देखरेखीसाठी तीन जण 24 तास कार्यरत असतात. गजेंद्रला दररोज 15 लिटर दूध, दोन किलो सफरचंद गव्हाची कणिक, कडबा आणि वेगवेगळ्या प्रकारचा पशु आहार दिला जातो.
विलास नाईक हे गजेंद्रला वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनात आणि स्पर्धेत घेऊन जातात. कर्नाटकात कर्नाटक किंग तर महाराष्ट्र महाराष्ट्र चॅम्पियन अशी उपाधी गजेंद्रला मिळाली आहे. पंजाब हरियाणामध्ये गजेंद्रला आणखी चांगली किंमत मिळेल असे नाईक यांना वाटते.
राज्यातच नाही तर परराज्यातील (Agricultural Exhibition) कृषी प्रदर्शनात देखील गजेंद्र (Buffalo) या रेड्याचीच चर्चा अधिक असते.
यापूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे पार पडलेल्या कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता तो हा दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा. आता हाच रेडा जिल्ह्यातील (Rahuri) राहुरी येथे पार पडत असलेल्या कृषी प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधत आहे. विशेष म्हणजे 4 महिन्यापूर्वीच या रेड्याला 80 लाख रुपयांत खरेदी करण्याची तयारी एका हौशी शेतकऱ्याने दर्शवली होती पण मालक विलास नाईक यांनी साफ नकार दिला होता. अवघ्या 4 महिन्यात 20 लाख रुपये वाढवून गजेंद्रला 1 कोटी रुपायांमध्ये खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती पण गजेंद्र हा घरची पैदास असल्यामुळे त्याला न विकण्याचा निर्णय घेतल्याचे विलास नाईक यांचे म्हणणे आहे.
1 कोटी रुपयांमध्ये खरेदीची तयारी
गजेंद्र हा मुरा जातीचा रेडा असून प्रत्येक कृषी प्रदर्शनात त्याचे दर्शन हे घडतेच. शिवाय रेड्याचा रुबाब आणि देखणे रुप पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी ही होतेच. असाच प्रत्यय राहुरी येथे पार पडत असलेल्या कृषी प्रदर्शनात आला. यापूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आयोजित कृषी प्रदर्शनात याच रेड्याला 80 लाखाची मागणी झाली होती. त्यानंतर अवघ्या 4 महिन्यांतच येथील प्रदर्शनात त्याला 1 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्याची तयारी दर्शविण्यात आली पण रेड्याचे मालक हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मुरा जातीच्या या रेड्याची पैदास ही घरची आहे. त्यामुळे विकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पण कृषी प्रदर्शन मात्र या गजेंद्र मुळे गाजते हे नक्की.
गजेंद्र’ रेड्याच खुराक तर पहा
आता दीड टन वजन म्हणल्यावर त्याचा खुराकही तसाच आहे. गजेंद्र हा मूळचा कर्नाटकातील मुंगसुळी या गावच्या विलास नाईक यांच्या मालकीचा आहे. दिवासाला 15 लिटर दूध, 3 किलो भरडा, 3 किलो आटा, 5 किलो सफरचंद, ऊस, गवत आधी खाद्य या गजेंद्रला दिवसाला लागते. नाईक यांच्या घरच्या मुरा म्हशींचा हा रेडा आहे. या रेड्याला पाहण्यासाठी हजार किलोमीटरवर वरून लोक पाहण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे गजेंद्र रेड्याचे वजन केवळ 4 वर्षे 5 महिने आहे.
चार महिन्यापूर्वी 80 लाखाची मागणी
मुरा जातीच्या या गजेंद्र रेड्याला पाहताच क्षणी कुणालाही तो खरेदी करावा असेच वाटते. यापूर्वी सांगली जिल्ह्यात पार पडलेल्या प्रदर्शनात त्याला तब्बल 80 लाखाला मागणी झाली होती. त्यानंतर आता येथील कृषी प्रदर्शनात 1 कोटीला मागणी झाली आहे. पण शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम आहे.यावरुन जनावरांबद्दलचे प्रेम काय असते याची तर प्रचिती येतेच पण विलास नाईक हे आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे गजेंद्र चा सांभाळ करीत आहेत.
Tags :
4598
10