Breaking- 'या' ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासाठी आंदोलनाचा इशारा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जेऊर हेबत्ती ग्रामपंचायतीच्या शासनाकडून आलेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे.
ग्रामपंचायतींमध्ये शासनाकडून मिळालेल्या निधीमधून कामे न करता तसेच पैसे काढण्यात आले आहेत जी कामे मंजूर आहेत ती आराखडया नुसार करण्यात आली नाही असे कामे फक्त रेकॉर्डवर घेण्यात आली मात्र प्रत्यक्षात कामे केली नाही फक्त बिले काढून निधी लाटण्यात आला असून या कामाची निःपक्षपाती चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणी साठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर याना आहे समक्ष भेटून ग्रामस्थ मागणी करणार आहे ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या अपहाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा पंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाचा अजब कारभार केला असून एकाच लाईट कामाचे दोनदा बिल काढले असल्याची चर्चा जोरात सुरू आहे या दोन्ही बिलांची चौकशी करून यात जे भ्रष्टकर्मचारी व आधीकारी यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी अशा ईशारा देण्यात आला आहे
चक्क त्या "सरपंचांनी" स्वता बांधकाम कामगार म्हणुन नोंदणी केली असल्याची चर्चा गावात जोरात सुरु आहे ही नोंदणी का केली ? या मागे काय कारण ? याची देखील चौकशी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे .
गावातील ड. यादी घोटाळा दलित वस्ती रस्ता रुंदीकरण, गटारी व सुशोभीकरणा साठी मोठा निधी खर्च करण्यात आला मात्र सुशोभीकरण करताना नुसत्या कुंड्या आणून ठेवल्या त्यात झाडांचा पत्ता नसल्याने ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारा बाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे .