महाराष्ट्र
शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; विविध मागण्यांसाठी पाच दिवसांचे धरणे आंदोलन
By Admin
शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; विविध मागण्यांसाठी पाच दिवसांचे धरणे आंदोलन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा संप पुकारून राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐरणीवर आणणाऱ्या अहमदनगर येथील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.
पुणतांब्यात आजपासून पाच दिवसांचे धरणे आंदोलन सुरू होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
पाच वर्षांपूर्वी , 2017 मध्ये पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून शेतकरी संपाची हाक दिली होती. त्यानंतर राज्यातील इतर शेतकरी संघटना या आंदोलनात उतरल्याने राज्यात तत्कालीन भाजप सरकारविरोधात शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला होता. आता, त्याच पुणतांब्यातून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
राज्यातील शेतकरी सगळ्या बाजूने आज अडचणीत सापडले आहेत. शेतात ऊस उभा आहे. कांद्याला भाव नाही, द्राक्ष टरबूज फेकून देण्याची वेळ आली आहे. तर विजेच्या संकटाने शेतकरी त्रस्त झाले असल्याचे पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी म्हटले. आजपासून ५ जूनपर्यंत पुणतांब्यातील शेतकरी गावात धरणे आंदोलन करणार आहेत. यामध्ये आंदोलनात राज्यभरातले
शेतकरी सहभागी होणार आहेत. ५ जूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करु, असा इशारा पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
कृषी दिंडीने आंदोलनाला प्रारंभ
बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धभिषेक करून गावातून कृषी दिंडीने पुणतांबा धरणे आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती सरपंच धनंजय धनवटे यांनी दिली. पुणतांबा ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी मंच उभारला आहे. हे आंदोलन 1 ते 5 जून पर्यंत सुरू असणार आहे. राज्यातील अनेक शेतकरी नेत्यांशी आंदोलनाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सरपंच धनंजय धनवटे यांनी दिली.
>> कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन:
1) ऊसाला एकरी एक हजार रूपये अनुदान द्यावे
2) शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे
3) कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा
4) कांद्याला प्रती क्विंटल 500 रूपये अनुदान द्यावे
5) शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण आणि सुरळीतपणे वीज मिळावी
6) थकित विजबिल माफ झाले पाहिजे
7) कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी
8)सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा
9) 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी
10) नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे
11) दुधाला ऊसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा
12) दुधाला कमीतकमी चाळीस रूपये दर दिला जावा
13) खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी
14) वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी
15) शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे
16) वन हक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर केल्या जाव्या
कृषी दिंडीने आंदोलनाला प्रारंभ
Tags :
71935
10