महाराष्ट्र
शासनाने आधार आधारित संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा सौ. संगीताताई शिंदे
By Admin
शासनाने आधार आधारित संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा सौ. संगीताताई शिंदे
2 वर्षे शाळा बंद, आता कुठे गाडी रुळावर; अशा परिस्थितीत आधार आधारित संचमान्यता अव्यवहार्य
ग्रामीण भागातील पालकांचा कोरोना परिस्थितीत रोजगार हिरावला पोटाचीच चिंता, परिणामी आधार नोंदणी कडे पालकांचे दुर्लक्ष
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आधार आधारित संचमान्यतेच्या विरोधात नाही पण सद्यस्थितीतील वेळ चुकीची; परीक्षा काळात शिक्षकांना कोंडीत धरण्याचा शासनाचा प्रयत्न
कोरोनामुळे तब्बल 2 वर्ष शाळा बंद असल्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये शाळांची घंटा वाजली व शाळा सुरू झाल्या. शिक्षणाची गाडी आता कुठे रुळावर येत आहे अशा परिस्थितीत शासनाने आधार आधारित संचमान्यता करण्याचे ठरविले आहे. हे वास्तव परिस्थितीचा विचार करता अव्यवहार्य असून हा शासननिर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील कोरोना काळातील परिस्थिती व रोजगार नसलेली परिस्थिती पाहता जिथे दोन वेळच्या पोटाची थडगी भरण्याचे वांदे (काळजी) आहे तिथे पालक आधार नोंदणी करणार कशी? कोरोना परिस्थितीत आधार केंद्र हे शहरी भागात असल्यामुळे ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या पाल्याच्या आधार नोंदणी कडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना आधार क्रमांक मिळू शकले नाही.
अशा सर्व बिकट परिस्थितीत सद्यस्थितीत आधार आधारित संच मान्यतेचा आग्रह धरणे परिस्थितीला साजेसा नाही. अशा विपरीत परिस्थितीत ही संचमान्यता करणे म्हणजे शिक्षक व पालकांना कोंडीत धरण्यासारखे आहे.आम्ही शासनाच्या संचमान्यतेच्या विरोधात नाही पण अशी आधार आधारित संच मान्यता करण्यास शासनाने शाळांना व पालकांना थोडा वेळ देणे आवश्यक आहे.
हा काळ 10 वी व 12 वीच्या परीक्षेच्या व अन्य वर्गाच्या परीक्षांचा काळ असल्यामुळे शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करण्यात गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत आधार कार्ड साठी शिक्षकांना धावपळ करायला लावल्यास अध्ययन अध्यापणा कडे दुर्लक्ष होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल असे होऊ नये यासाठी सर्व वास्तव परिस्थिती लक्षात घेता शासनाने निर्गमित केलेला आधार आधारित संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांनी केली आहे.
Tags :
28588
10