माजी सैनिकाचा तहसिलदाराच्या दारात मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अरूण लक्ष्मण पठारे (वय 62) असे सदर माजी सैनिकाचे नाव आहे. तहसिलदारांच्या दालनाटच त्यांना हृदयविकारा झटका आला अन त्यांचा मृत्यू झाला.
सदर घटना काल सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. समजलेली माहिती अशी : अरूण पठारे हे माजी सैनिक जवळे येथील रहिवासी आहेत.
ते आपली शेती करत असून त्यांच्या शेतजमीनी जवळील रस्त्याचा वाद सुरू आहे. त्यासंदर्भात पठारे यांनी न्यायालयात दाद मागून संबंधित निर्णयास न्यायालयाकडून स्थगिती मिळविली होती.
या आदेशाची प्रत तहसिलदारांना देण्यासाठी पठारे हे सोमवारी सकाळी तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांच्या दालनात आले होते. दरम्यान तेथे आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
त्यांना चक्कर आली अन ते जमिनीवर कोसळले. प्रसंगावधान राखून तहसिलदार आवळकंठे यांनी तात्काळ रूग्णवाहिका पाचारण करून पठारे यांना पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात हालविले.
दरम्यान तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सदर घटनेची माहीती समजताच आमदार नीलेश लंके यांनी रूग्णालयात धाव घेतली. पाठारे यांच्या त्यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.
पारनेर येथील तहसील कार्यालयात माजी सैनिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतजमीनीच्या रस्त्याच्या वादाबाबत न्याय मागण्यासाठी ते तहसील कार्यालयात आले असल्याची माहिती मिळाली आहे.