महाराष्ट्र
मुळा धरणात बुडून नगरच्या पर्यटकाचा मृत्यू ; सूचना फलक नसल्याने नेहमी घडतात घटना
By Admin
मुळा धरणात बुडून नगरच्या पर्यटकाचा मृत्यू ; सूचना फलक नसल्याने नेहमी घडतात घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर हून पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा मुळा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.स्थानिकांच्या मदतीने सायंकाळी साडेपाच वाजता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
राहुरी : अहमदनगर हून पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा मुळा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.स्थानिकांच्या मदतीने सायंकाळी साडेपाच वाजता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. चेतन कैलास क्षीरसागर (वय ३८, रा. श्रमिकनगर, पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक, सावेडी, अहमदनगर असे मृताचे नाव आहे.
मयत चेतन समवेत त्याचे मित्र बाळकृष्ण धारुणकर, सोमनाथ देवकर, बाळासाहेब शिंदे, संतोष मेहत्रे, निलेश धारुणकर, बाळासाहेब जुंदरे, संदीप शिंदे, आशुतोष भागवत, राजेंद्र करपे, योगेश पतले, नितीन फल्ले, मिलिंद क्षीरसागर (सर्वजण रा. अहमदनगर) असा १३ जणांचा ग्रुप मुळा धरणावर पर्यटनासाठी आला होता.
धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकी जवळून आत जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळे, जलसंपदाच्या कर्मचारी वसाहतीमधील रस्त्याने सर्वजण चमेली गेस्ट हाऊस जवळ गेले. सायंकाळी चार वाजता चमेली गेस्ट हाऊसच्या
मागील बाजूस धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी काहीजण उतरले. काहीजण काठावर बसले. तेथील खोल पाण्यात उतरलेला चेतन क्षीरसागर दमछाक होऊन पाण्यात बुडाला. मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस नाईक गणेश सानप यांनी सायंकाळी साडेपाच वाजता स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर ठिकाणी धोक्याची सूचना देणारा फलक नसल्याने यापूर्वीही अनेक तरुण पर्यटकाना जलसमाधी मिळाली आहे.पाण्याचा अंदाज येत नसल्याने या घटना वारंवार घडत असताना पाटबंधारे विभागाने आजतागयत धोक्याची सूचना देणारा फलक लावलेला नाही.पोलीस विभागाने पुढाकार घेऊन या ठिकाणी फलक लावण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.
Tags :
645
10