नाशिक- एसटी कर्मचाऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नाशिकमधील शिवनाथ कापाडे हे गेल्या आठ वर्षांपासून शहापूर आगारात नोकरीला होते. गेल्या चार महिन्यांपासून इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे ते सुद्ध एसटीच्या विलीनीकरणासाठी आंदोलनात उतरले. त्यामुळे आधीच बिकट असलेली आर्थिक परिस्थिती आणखी खालावली. दुसरीकडे हाताला काम नाही. सरकार नमते घेत नाही. हे सारे पाहता त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बातमी संपकरी कर्मचाऱ्यांना समजली. तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय स्फोटक होत्या. मात्र, सरकारच्या थंड हालचालीमुळे असे अजून किती कर्मचारी गमावावे लागणार, असा सवाल विचारला जातोय.
नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शिवनाथ कापाडे असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकित होता. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर आगारामध्ये तर थांबलेल्या बसमध्ये स्वतःच्या बॅगचा बेल्ट काढून बसचालक संजय केसगिरे यांनी आत्महत्या केली. अहमदनगरमध्ये एसटी ड्रायव्हरने आपले जीवन असे संपवले. मात्र, चार महिन्यांपासून जास्त दिवस होऊन एसटीचा संप अजूनही सरकारला मिटवता आला नाही. याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.