पाथर्डी तालुक्यातील तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्यास अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्यास अटक करण्यात आले आहे. याबाबत पीडित दीपक बांदल (वय 21 वर्षे, रा. भांबोली, तालुका खेड, जिल्हा पुणे; मुळगाव अल्हनवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर) यांनी चाकण (महाळुंगे चौकी) येथे फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी योगेश घुले (वय 25 वर्षे, रा. बालाजी नगर मेदनकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे; मूळ रा. भांडेगाव, तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात चाकण (महाळुंगे चौकी) भा.द.वि कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी भांबोली गावातील हॉटेल रुद्रा चायनीजचे (Chakan Crime) समोर रोडवर काल 22 ऑगस्टला रात्री 8 वाजेच्या सुमारास आला व म्हणाला तू माझ्या प्रेयसीवर प्रेम करू नको, तिचा नाद सोडून दे, ती माझी प्रेयसी आहे. त्यानंतर आरोपीने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या हातावर व डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ वार केले. तसेच, फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटावर वार करून गंभीर जखमी केले आहे.