ट्रंकचे टायर फुटल्याने एक ठार एक जखमी ; लिंबाच्या झाडाला धडकला ट्रंक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
भरधाव ट्रकचे समोरचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-जालना मार्गावरील देमणी (ता.औरंगाबाद) परिसरात घडली.
दुधड - भरधाव ट्रकचे समोरचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.
१५) औरंगाबाद-जालना मार्गावरील देमणी (ता.औरंगाबाद) परिसरात घडली. किन्नर किशन दत्तात्रेय जमतडे (५५, रा. लोहाळा, ता. किल्लारी, जि. लातूर, ह.मु. पुणे) असे मृताचे तर चालक विलास मुरलीधर कसबे (४०, रा. घोडेगाव, ता. नेवासा, जि. नगर) असे जमखीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती की, एक ट्रक (एमएच-१७, बीडी-३९२०) लोखंडी पट्ट्या घेऊन जात असताना सदरील ट्रकचे टायर औरंगाबाद - जालना महामार्गावरील देमणी शिवारातील वृंदावन हॉटेलसमोर फुटले. नंतर चालकाचा ताबा सुटून ट्रक एका लिंबाच्या झाडाला धडकला. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रकचे केबिन तोडून जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी एकास मृत घोषित केले. अधिक तपास पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार सुनील लहाने, सुनील गोरे, श्री. नागलोत, गणेश कांबळे करीत आहेत.