श्री क्षेत्र मढी परीसरात बिबट्याचं दर्शन ;नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेञ मढी परीसरात बीबट्याचं दर्शन झाल्यानं पुन्हा एकदा नागरीकांमधे भितीचे वातावरण निर्माण झालं.
काल गुरुवार दि. २५ राञी मढी परीसरात विजय साळवे यांना प्रथम बिबट्या दिसला. त्यांनी तात्काळ मढी देवस्थानाच्या अधिकाऱ्यांना याची माहीती दिली. मंदिर प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेत परिसरातील नागरीकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं.
तिसगाव वनपरीक्षेञ अधिकारी व कर्मचारी यांनी मढी येथे येउन बिबट्याच्या पायांचा ठसा तपासून हा बिबट्याचं सुनिश्चित केलं. यावर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा बदलण्याची कार्यवाही सुरु केली.
बिबट्या आढळुन आल्याची सुचना मिळताच वनविभागानं घटनास्थळी धाव घेउन बिबट्याच्या पायांच्या ठश्याचं निरीक्षण केलं असता बिबट्याचा वावर असल्याचं लक्षात आलं.
मढी आणि परीसरातील गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले.
जिथं बिबट्या आढळुन आला आहे तिथं पिंजरा बदलण्याची कार्यवाही सुरु केली आहे, असे तिसगाव वनपरीक्षेञ अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी सांगितलं.