महाराष्ट्र
जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकर्यांचे आंदोलन
By Admin
जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकर्यांचे आंदोलन
पाथर्डी तालुक्यातून जाणार्या पैठण-पंढरपूर व खरवंडी कासार-लोहा राष्ट्रीय महामार्गातील शेतकर्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी आंदोलन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातून जाणार्या पैठण-पंढरपूर व खरवंडी कासार-लोहा राष्ट्रीय महामार्गातील शेतकर्यांच्या जमिनीचा मोबदला व अन्य अडचणी त्वरित सोडवाव्यात, या मागणीसाठी पाथर्डी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर घंटानाद व बैठा सत्याग्रह आंदोलन भालगाव येथील माजी सरपंच अंकुश कासोळे व परिसरातील शेतकर्यांनी केले.
सप्टेंबरअखेरपर्यंत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन संबंधित अधिकार्यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रांतधिकारी देवदत्त केकाण, औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अभिषेक पुल्लावार, शाखा अभियंता आर. आर. परजणे आंदोलक शेतकर्यांना सामोरे गेले. अंकुश कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश सुपेकर, सचिन बेंद्रे, बाळासाहेब बनसोडे, बाळासाहेब खेडकर, भागवत सुपेकर, सावता बनसोडे, अंबादास खेडकर, अशोक जगन्नाथ खेडकर, जयहिंद जायभाय, जगन्नाथ गुळवे, विष्णू थोरात, भगवान हजारे, बाबासाहेब खेडकर, मंगेश सानप, राधाकिसन खेडकर, सदाशिव बनसोडे, लक्ष्मण खेडकर, रामदास खेडकर, आजीनाथ खेडकर, अशोक खेडकर आदी उपस्थित होते. शेतकरी व अधिकार्यांची रस्त्यांच्या विविध प्रश्नावरून खडाजंगी झाली.
पैठण -पंढरपूर व खरवंडी कासार-लोहा या दोन महामार्गाच्या कामात तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, शेतकर्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नाही. रस्त्याच्या कडेला गटाराचे खोदकाम झाले नसल्याने पावसाच्या पाण्याने जमिनीचे नुकसान झाले आहे. काही शेतकर्यांना मोबदला देण्यात आला, तर काहींना मिळाला नाही. रस्त्याचे काम होताना अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवले. साईट गटारांचे काम झाले नसल्याने पावसाचे पाणी क घरामध्ये घुसून नुकसान होत आहे. रस्त्याच्या बाजूला शेतकर्यांच्या जमिनीमध्ये ये-जा करण्यासाठी रस्ता राहिला नाही. तो रस्ता ठेकेदार यांनी व्यवस्थित करून द्यावा, संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, अशा अनेक मागण्यासाठी आंदोलन झाले.
चार वर्षांपासून रस्त्याचे भूसंपादन झाले आहे. अनेक त्रुटींमध्ये शेतकर्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी प्रशासकीय फेर्यांमध्ये हा प्रश्न अडून बसला आहे. अधिकारी गांभीर्याने याची दखल घेत नाही. शेतकर्यांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रकार होत आहे. आता आम्ही थांबणार नाही. प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावून न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे.
– अंकुश कासोळे, माजी सरपंच, भालगाव.
Tags :
1068
10