महाराष्ट्र
पोलिसांकडून 3 दुचाकी चोर अटकेत, 25 दुचाकी केल्या जप्त
By Admin
पोलिसांकडून 3 दुचाकी चोर अटकेत, 25 दुचाकी केल्या जप्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
चाकण पोलिस ठाण्याच्या डी बी पथकाने (Chakan Vehicle theft) 3 मोटर सायकलचोरांची धरपकड केली आहे. या दुचाकी चोरांकडून पोलिसांनी एकूण 12.50 लाख रुपयांच्या 25 मोटर सायकली जप्त केल्या आहेत.
अशोक सोनवणे, रा. राळेगण थेरपाळ, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, फारूक पठाण, रा. चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे, योगेश वटंबे, रा. बालाजीनगर चाकण, तालुका खेड या 3 आरोपींना अटक करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालायांतर्गत चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तींकडून मोटर सायकल चोरी होत होत्या.(Chakan Vehicle theft) मोटर सायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिबडे यांनी वैभव शिंगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या. त्यामुळे शिंगारे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदारांना त्याबाबतचे आदेश दिले.
तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व विक्रम गायकवाड तसेच पथकातील अंमलदार यांनी वाहन चोरोच्या घटनास्थळी भेट देऊन त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. तसेच गोपनीय बातमीदार व तांत्रिक तपासाचा वापर करून मोटर सायकल चोरी करत असलेल्या आरोपींचा शोध घेत होते.(Chakan Vehicle theft) 13 ऑगस्टला तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, सहाय्यक पोलीस फौजदालर, सुरेश हिंगे, पोलीस नाईक हनुमानत कांबळे, पोलीस अंमलदार प्रदीप राळे, निखिल वर्पे हे मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याकरिता पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना शिंगारे व पथकास बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी अशोक सोनवणे, फारूक पठाण व योगेश वटंबे हे मोटर सायकल चोरी करिता साबळेवाडी व मेदनकरवडी चाकण परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
आरोपी अशोक सोनवणे हा भोसे, चाकण येथील चोरीची मोटर सायकल घेऊन फिरत असताना त्याला तपास पथकातील पेट्रोलिंग करीत असलेल्या अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा लावून ताब्यात घेतले. अतिशय कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर त्याच्याकडून चाकण पोलीस ठाणे व इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी केलेल्या एकूण 19 हिरो होंडा कंपनीच्या स्प्लेंडर व स्प्लेंडर प्लस मोटर सायकल काढुन घेतल्या. तसेच त्याला अटक केल्यानंतर आरोपी फारूक पठाण व योगेश वटंबे यांना अटक करून त्यांच्याकडून स्प्लेंडर प्लस, टी व्ही एस, मेस्ट्रो अशा एकूण 6 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या. (Chakan Vehicle theft) तसेच इतर 12 वाहनांच्या इंजिन नंबर व चेसी नंबर वरून वाहन मालकांची माहिती घेऊन दाखल गुन्ह्यामध्ये ही वाहने वर्ग करण्याची तजवीज ठेवली आहे. तसेच या वाहनांबाबत अधिक तपास चालू आहे.
Tags :
1014
10