राहुलनगर येथे बिबट्याला जेरबंद करण्यात यश
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील राहुलनगर येथे बिबट्याला जेरबंद करण्यात इगतपुरी वन विभागाला यश आले आहे. राहुलनगर येथील दुर्गा देवी टेकडी येथे बिबट्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
वन अधिकार्यांनी बिबट्याला इगतपुरी येथे नेण्यात आले असल्याचे सांगितले.
इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस व वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक स्वाती लोखंडे, गोरख बागूल, फैजअली सय्यद, माऊली, तसेच वनमजूर दशरथ निर्गुडे, गोविंद बेंडकोळी, भोरु धोंगडे, धोंडीराम पेढेकर, पूनाजी कोरडे व अर्जुन मदगे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
ताब्यात आलेल्या बिबट्याला ट्रॅक्टरद्वारे इगतपुरी वनविभाग ऑफिस येथे नेण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यात विविध गावांमध्ये बिबटे असून, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आजच्या घटनेमुळे ग्रामस्थांनी वन खात्याचे आभार मानले आहेत.