Breaking-एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये एसटी कार्यशाळेच्या बाजूला असलेल्या एका ऑइल पेंट कंपनीला आज सोमवार दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यामुळे ही कंपनी जळून खाक झाली. यावेळी परिसरातील लोकांनी स्थानिक प्रशासनाला कळविले असून आजूबाजूला लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागली. सरफेस कोटिंग कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भर दुपारी लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणेने मोठे प्रयत्न केले. मात्र, ऑइलमुळे आग भडकत राहिली. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
श्रीरामपूरच्या एसटी विभागीय कार्यशाळेच्या मागे ही ऑइल पेंटची कंपनी आहे. तेथे शॉर्ट सर्किट होऊन भर दुपारी आग लागली.
आगीमुळे मोठ्या प्रमाणावर काळ्या धुरांचे लोट आकाशात जात होते. धुराचे लोट चार ते पाच किलोमीटरवर पसरले होते. आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनीनी सांगितले आहे.
जिवीत हानीसंबंधीची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.