ग्रामविकास अधिका-याच्या विरोधात 'या' गावातील ग्रामस्थांचे उपोषण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दलित वस्ती योजनेच्या रस्त्याचा ठराव होऊनही निपाणी वडगावचे ग्रामविकास अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई केल्याने सदरच्या रस्त्याचे काम रद्द झाल्या च्या निषेधार्थ श्रीरामपूर पंचायत समिती कार्यालय समोर निपाणी वडगावचे ग्रामस्थांसह भागचंद नवगिरे यांनी आमरण उपोषण केले.ग्रामविकास अधिकारी यांनी जाणीवपूर्वक व एका गाव गुंडाच्या सांगण्यावरुन आठ महिने बदली प्रस्ताव दाबून ठेवला असल्याचा आरोप करुन दप्तर दिरंगाई कायद्यातंर्गत संबंधित ग्रामविकास अधिकारीवर कारवाई करण्याची मागणी केली.
निपाणी वडगाव येथील दलित वस्ती योजनेतील जुनी मराठी शाळा येथील रस्ता ग्राम विकास अधिकारी यांनी जाणीवपूर्वक एका गावगुंडाच्या सांगण्यानुसार आठ महिने बदली प्रस्ताव आपल्या कार्यालया त दाबून ठेवला होता.वारंवार विनंत्या करून व मागणी करून देखील वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला नाही.शेवटी वर्ष अखेरी स प्रस्ताव कार्यायात सादर केला.त्यामुळे सदरील प्रस्ताव रद्द झाला.या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलं बवा लागला असल्याचे नवगिरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
संबंधीत ग्रामविकास अधिकारी गावातील गाव गुंड यांच्या मदतीने व ठेकेदाराची आर्थिक देवाण-घेवाण करून मनमानी कारभार चालवत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. आयकर विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्यामार्फत ग्राम विकास अधिकारी यांची चौकशी व्हावी,दप्तर दिरंगाई कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्ते नवगिरे यांनी केली आहे.