महाराष्ट्र
मुळा धरण ऑगस्टच्या मध्यावर भरणार - पंजाबराव डख
By Admin
मुळा धरण ऑगस्टच्या मध्यावर भरणार - पंजाबराव डख
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा बाजार च्या वतीने नवीन खत विक्री केंद्राचा उद्घाटन समारंभ शनि दि 30 जुलै 2022 रोजी हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या हस्ते व युवा नेते उदयन गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी उदयन गडाख यांनी मुळा बाजार सोनईच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मुळा बाजारने सोनई व नेवासा परिसरातील नागरिक,शेतकरी यांना कश्या प्रकारे सहकार्य केले याविषयी माहिती दिली तसेच तालुक्यातील अनेक ग्राहकांनी या बाजाराला पसंती दिली आहे.यापुढेही मुळा बाजार शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहील सदैव गुणवत्तापूर्ण पध्दतीने काम करील आशा आशावाद उदयन गडाख यांनी व्यक्त केला.मुळा बाजार सोनई
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मुळा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची व कारखाना कार्यस्थळाची पाहणी केली. मा खा यशवंतराव गडाख व मा मंत्री आ शंकरराव गडाख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा सहकारी साखर कारखान्याची परिस्थिती चांगली असून कारखाना मुळा सह साखर कारखाना राज्यातील एक उत्कृष्ट कारखाना आहे तसेच परिसरातील वृक्ष संवर्धनचे कौतुक डख यांनी आवर्जून केले, पंजाबराव डख पुढे बोलताना म्हणाले सोनई व परिसरात येत्या 4 ऑगस्ट नंतर मुसळधार पाऊस पडणार आहे, पुढील महिन्यात होणाऱ्या पाऊसमुळे शेतकऱ्यांची जीवनदायी म्हणवणारे मुळा धरण भरणार आहे, आपल्या अचूक अंदाज बद्दल त्यांनी अनेक दाखले देत शेतकरी, मुळा बाजारचे सभासद तसेच उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले याप्रसंगी रावसाहेब कांगुणे सभापती पंचायत समिती नेवासा, नानासाहेब तुवर चेअरमन मुळा सह साखर कारखाना सोनई यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत दरंदले यांनी केले याप्रसंगी जेष्ठ नेते विश्वासराव गडाख, युवा नेते उदयन गडाख, भाऊसाहेब मोटे, बाळासाहेब गोरे
चेअरमन मुळा बाजार सोनई, रामदास घुले व्हा चेअरमन मुळा बाजार सोनई, किशोर जोजार उपसभापती ,अनिलराव अडसुरे, तुकाराम शेंडे, नारायण लोखंडे, लक्ष्मणराव जगताप, योगेश होंडे, संजय जंगले, रंगनाथ जंगले, दादासाहेब शेळके, बाळासाहेब पाटील, कैलास झगरे, सीताराम जाधव, मदनराव डोळे, उदय पालवे , बाळासाहेब सोनवणे, दिलीप शेलार, धनंजय वाघ,निसार सय्यद, आण्णासाहेब ढेरे, भास्करराव जाधव व्ही एम दरंदले आदींसह सोनई व नेवासा परिसरातील शेतकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags :
72944
10