महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनीची इलेक्ट्रीक टॉवरची तार चोरी करणारी टोळी पकडली
By Admin
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनीची इलेक्ट्रीक टॉवरची तार चोरी करणारी टोळी पकडली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर एलसीबीची मोठी कारवाई
तालुक्यातील वासुंदे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनीची इलेक्ट्रीक टॉवरची ॲल्युमिनिअम तार चोरी करणारी टोळी पकडली. चोरट्यांकडून १ लाख ३ हजार ३९० रु. कि.चे मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई नगर स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. श्रीकांत ऊर्फ शिरक्या फकिरा मनतोडे (वय २०, रा. आश्वी खु, ता. संगमनेर), फारुख युसूफ सय्यद ( वय २८, रा. जुने जोर्वे रोड, ता. संगमनेर ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल व संगमनर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोनि. अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि गणेश इंगळे, सफौ बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ मनोज गोसावी, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, पोना शंकर चौधरी, विजय ठोंबरे, सुरेश माळी, सचिन आडबल, रवि सोनटक्के, पोकाॅ रोहित येमुल व चापोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. २२ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनीचे कल्पतरु टॉवर्स पॉवर ट्रान्समिशन लि. कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरीस आहे. दि. १९ जुलै २२ रोजी सहकारी सुमो वाहनातून पेट्रोलिंग करत असतांना वासुंदे, ता. पारनेर जवळील टॉवर नं. १७६-१७७, १७८.१७९ या टॉवरमधील AAAC ६४०५q mm conductor मध्ये असलेली २६९० मीटर २,००,०००/- रू किं.ची इलेक्ट्रीक तार अज्ञात इसमांनी चोरून नेली होती. या विभाष कुमार भोलाप्रसाद महतो ( रा. ओमसाई कॉम्प्लेक्स, लक्ष्मी चौक, नारायणगांव, ता. जुन्नर, जिल्हा-पुणे) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५८२ / २०२२ भादविक ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोनि श्री. अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमणूक करुन कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले.
आदेशाप्रमाणे स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपीची माहिती घेऊन शोध घेत असतांना पोनि श्री कटके यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा श्रीकांत मनतोडे (रा. आश्वी, ता. संगमनेर) याने केला आहे. तो आता त्याचे राहते घरी आलेला आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थागुशा पथकाने आश्वी (ता. संगमनेर) येथे जाऊन आरोपी श्रीकांत मनतोडे हा त्याचे साथीदारा सोबत घरी झोपलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने पथकाने पहाटे ४ वा चे सुमारास आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकला असता आरोपीस पोलीस पथकाची चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेऊन ऊस शेतामधून पळून जाऊ लागले. पथकाने आरोपींचा पाठलाग करुन एकास ताब्यात घेतले. व इतर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन ऊसाचे शेतामध्ये पळून गेले.
त्यांचा ऊसाचे शेतामध्ये जाऊन शोध घेतला असता ते पोलिसांना मिळून आले नाहीत. ताब्यात घेतलेल्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव श्रीकांत ऊर्फ शिरक्या फकिरा मनतोडे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा त्याच्या पळून गेलेले साथीदार शरद ऊर्फ गोट्या हरीभाऊ पर्वत (रा. दाढ, ता. राहाता) व नरेंद्र ऊर्फ न-या पंढरीनाथ इंगळे (रा. आश्वी, ता. संगमनेर) यांच्यासोबत मिळून केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात चोरी केलेली टॉवरची इलेक्ट्रीक तार बाबत विचारपूस करता त्याने ती अकोले नाका (संगमनेर) येथील फारुख सय्यद भंगार दुकानदार यास विक्री केली आहे, अशी माहिती दिली. माहितीचे अनुषंगाने पथकाने आरोपी श्रीकांत मनमोडे यास सोबत घेऊन संगमनेर येथील भंगाराचे दुकानामध्ये जाऊन दुकानात असलेल्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव फारुख युसूफ सय्यद (वय २८, धंदा भंगार दुकान, रा. जुने जोर्वे रोड, ता. संगमनेर) असे असल्याचे सांगितले. पथकाने त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेली टॉवरची इलेक्ट्रीक तार बाबत विचारपूस
केली असता त्याने ४९० किलो वजनाची टॉवरची इलेक्ट्रीक तार आरोपीकडून भंगारामध्ये घेतल्याची कबुली दिली. इलेक्ट्रीक तार पथकासमक्ष काढून दिल्याने पोलिसांनी १ लाख ३ हजार ३९० रु. किंचे मुद्देमालासह दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पारनेर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील कारवाई पारनेर पोलीस करीत आहे.
आरोपी श्रीकांत ऊर्फ शिरक्या फकिरा मनतोडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द आश्वी पोलीस ठाण्यात दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे चार गुन्हे दाखल आहेत. दि. १२ नोव्हेंबर २९ पासून १८ महिन्याकरीता अहमदनगर, पुणे व नाशिक अशा तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.
आरोपी फारुख युसूफ सय्यद हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर संगमनेर शहर व आश्वी पोलिस ठाण्यात जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहे.
Tags :
9153
10