महाराष्ट्र
आरटीओंना(RTO) 'या' ठिकाणी कार्यालयात घुसून मारहाण
By Admin
आरटीओंना(RTO) 'या' ठिकाणी कार्यालयात घुसून मारहाण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सदर घटना श्रीरामपूर मधील आहे.
येथील परिवहन अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ आरटीओ अधिकार्यास शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आल्याचे वृत्त आहे. गणेश आमले व विजय जाधव असे मारहाण करणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत.
एक आरटीओंना मारहाण केल्याचे वृत्त आले आहे. ऑनलाईन नोंदणी न करताच तात्काळ कागदपत्रांची मागणी दोघा व्यक्तींनी केली होती.
परंतु त्या पद्धतीने ते दिले नसल्याचा राग येऊन वरिष्ठ आरटीओंना या दोघा व्यक्तींनी शिवीगाळ अन मारहाण केली.
दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. समजलेली अधिक माहिती अशी : गणेश आमले व विजय जाधव हे दोन तरुण शिरसगाव येथील आहेत.
हे दोघे मोटारसायकलवरुन आले आणि बरेच दिवस झाले सगळी कागदपत्रांची पूर्तता केलेली असून आम्हाला आमची रजिस्टर नोंदणी करावी, अशी मागणी केली. त्यावर आरटीओ अधिकार्यांनी ऑनलाईन नोंदणी करा तुम्हाला तात्काळ तुमचे रजिस्ट्रेशन नोंदणी करतो असे सांगितले.
मात्र या दोघांना राग अनावर झाला आणि त्यांनी त्या अधिकार्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात करुन त्यांना मारहाण केली. ही माहिती कार्यालयात पोहोचताच सर्व अधिकारी व कर्मचारी त्याहीक्षणी जमा झाले.
त्यांनी या दोघांना ताब्यात घेत पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे यांनी आपल्या सहकार्यांना घेवून घटनास्थळी धाव घेतली.
या दोघांनाही ताब्यात घेतले. दरम्यान जी घटना घडली तिचा परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी निषेध व्यक्त केला.
दरम्यान या दशतीमुळे परिवहन कार्यालय परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येवून गणेश आमले व विजय जाधव या दोघांविरुध्द शिवीगाळ करुन मारहाण करणे
व सरकारी कामात अडथळा आणणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे सदर घटनेवर नियंत्रण ठेवून होते.
Tags :
40512
10