युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थांचा शासनाने गांभिर्याने विचार करावा मनिषा खेडकर
पाथर्डी - प्रतिनिधी
प्रतिकूल परिस्थितीशी झगडत पूजा बोरुडे हिने शिक्षणाच्या माध्यमातून उंच झेप घेण्याचा निर्णय घेतला, मात्र संघर्षाने पुजाची युक्रेनमध्येही पाठ सोडली नाही.थरारक प्रसंगातून मायदेश गाठले.शासनाने आता पुजासारख्या विद्यार्थांच्या भवितव्याचा गांभिर्याने विचार करत त्यांच्या शिक्षणाची सोय करावी, असे प्रतिपादन उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा खेडकर यांनी व्यक्त केले.
येथील कु.पूजा संजय बोरुडे ही विद्यार्थिनी युक्रेनमधून परतल्याबद्दल ॲड.प्रतापराव ढाकणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्षा रत्नमाला उदमले,आरती निऱ्हाळी,ज्योती भापकर,सिमा औटी,बेबीताई औटी,कौशल्या खोर्दे,चंद्रकला गर्जे,अश्विनी पोटफोडे,सोनाली भापकर,ज्योती बोरुडे,अक्षदा उदमले,शाहीन आतार,मीना सदावर्ते आदी उपस्थित होत्या.
यावेळी डॉ.खेडकर म्हणाल्या,महिलांचे संपूर्ण जीवनच इतरांची काळजी घेण्यात जाते.या धकाधकीत त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळेच त्यांना स्वतःच्या जीवनशैलीकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.
महिला तालुकाध्यक्षा तथा नगरसेविका सविता भापकर म्हणाल्या,पूजाच्या आईने पतीचे छत्र हरपल्यानंतरही हार न मानता मुलीसाठी मोठा संघर्ष करत पुजाला वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात पाठविले, ही बाब इतरांसाठी प्रेरणादायी आहे.पाथर्डीसारख्या छोट्या शहरातून अतिउच्च ध्येय गाठण्यासाठी बोरुडे कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय अभिमानास्पद असून पूजा बोरुडेच्या शैक्षणिक भवितव्यासाठी कोणतीही अडचण आल्यास ॲड.प्रतापराव ढाकणे व सौ.प्रभावती ढाकणे यांच्या सहकार्याने ती सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करु.
आभार सौ.आरती निऱ्हाळी यांनी मानले.