महाराष्ट्र
पाथर्डी- साहेब 'या' गावातील दारुचा तुम्ही बंदोबस्त करा महिलांची आर्त हाक; पोलिसांना दिले निवेदन
By Admin
पाथर्डी- साहेब 'या' गावातील दारुचा तुम्ही बंदोबस्त करा महिलांची आर्त हाक; पोलिसांना दिले निवेदन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
साहेब माझा मुलगा दारू पितो म्हणून मुलाचं लग्न होत नाही, पहिले अवैध दारू बंद करा…, साहेब नवरा रोज दारू पिऊन मला मारहाण करतो हो..,"घर बांधण्यासाठी आणलेले व्याजाचे पैसेही दारूत घातले…, माझी तीन वर्षांची मुलगी आहे, मी मुलीला घरी सोडून गावात घरकामाला जाते आणि माझा नवरा दारू पिऊन इकडे तिकडे भटकतो, मुलगी एकटीच घरात असते साहेब…," या दारुचा तुम्ही बंदोबस्त करा, या दारूमुळे आमच्या प्रपंचाची राख रांगोळी होत आहे, अशी कैफियत पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव येथील महिलांनी पोलिस अधिकार्यांसमोर मांडली.
माळी बाभुळगाव येथील गावठी दारूचा विक्री बंद करावी या मागणीसाठी महिलांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात निवेदन दिले. अनेक महिलांनी दारूच्या आहारी गेलेल्या पुरुषांच्या कथा व्यक्त करून पोटतिडकीने आपल्या व्यथा पोलिसांसमोर मांडल्या.
महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, माळी बाभुळगाव गावातील गावठी दारुचा विक्री बंद करावा, हरिजन वस्ती येथे अनेक वर्षांपासून गावठी दारूचा व्यवसाय आहे. गावातील अनेक घरातील तरुण दारूच्या आहारी गेले आहेत. दारुमुळे आमचे घर बरबाद झालेे. आमचे संसार उघड्यावर आले. घरातील पुरुष मंडळी दारू पिऊन पूर्ण बरबाद झाले आहेत. दारूच्या व्यसनामुळे आम्ही कर्जबाजारी झालो. अंजना तिजोरे, काजल पवार, रंजना फाजगे, अनिता पवार, वंदना तिजोर, अजिता पवार, मंगल तिजोरे, कमल पवार, पूजा तिजोरे, निशा पवार, अर्चना पवार, मथाबाई पवार, वैशाली फाजगे, लीला तिजोरे, जुबेदा शेख, मालन शेख, शोभा तिजोरे, संगीता पवार, ज्योती पवार, सुरेखा काळे, संगीता नन्नवरे, वि. रा. तिजोरे, कमल फाजगे, लक्ष्मी फाजगे आदी महिलांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.
मध्यवर्ती ठिकाणी दारुविक्री
दारुचा व्यवसाय आमच्या घराजवळच असल्यामुळे आमच्या घरचे वारंवार दारू पितात, हा अड्डा गावात मध्यवर्ती ठिकाणी असल्याने गावातील दारू पिणारे लोक समाज मंदिरात बसून शेरेबाजी करतात. आमच्या तरुण मुलींना शाळेत जाता येत नाही. गावातील अवैध दारू व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावा, हा व्यवसाय बंद झाला नाही, तर आम्हाला जगणे मुश्किल होईल. आम्हाला जीव द्यावा लागेल याची जाणीव ठेवून सहकार्य करण्याची मागणी महिलांनी निवेदनातून केली.
Tags :
1291
10