अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल इतक्या सोसायट्यांची निवडणूक जाहीर
अहमदनगर- प्रतिनिधी
जिल्हा सहकारी बँकेचा निवडणुकीचा निकाल लागतो न लागतो तोच जिल्ह्यातील सहकारी सेवा सोसायटी यांचा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.
जिल्ह्यातील एकूण 50 सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी 22 पासून उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्यास सुरुवात झाली असून 27 तारखेपर्यंत यास मुदत आहे.
निवडणुका होणाऱ्या सोसायटीमध्ये सर्वाधिक श्रीगोंदा तालुक्यातील 13 असून संगमनेर तालुक्यातील आठ संस्थांचा यात समावेश आहे.
जिल्ह्यात 2020 मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची संख्या 1900 पेक्षा अधिक आहे या सर्व सहकारी संस्थांची निवडणूक घेणाऱ्या वर्षभरात पूर्ण करण्याचे आव्हान सहकार विभागाकडे आहे.
त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक संपताच राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या मान्यतेने जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
याच 27 फेब्रुवारी पर्यंत अर्ज विक्री आणि दाखल करणे एक मार्चला छान नि दोन मार्चला उमेदवारांची यादी 16 मार्च पर्यंत माघार आणि 17 मार्चला चिन्हांचे वाटप करण्यात येऊन 26 ते 29 मार्च दरम्यान निवडणूक पार पडणार आहे मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यावर लगेच मतमोजणी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.