महाराष्ट्र
645
10
सहा हजार किलो गोमांस जप्त; तिघांना अटक
By Admin
सहा हजार किलो गोमांस जप्त; तिघांना अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
रविवारी (दि. 28) पहाटे गोरक्षकांच्या मदतीने शिक्रापूर पोलिसांनी ही कारवाई केली. गोमांस वाहतूक करणार्या मुजीब मारूब पठाण (वय 32, रा. घास गल्ली अहमदनगर), सय्यद परवेझ अख्तर (वय 30, रा. कसाई गल्ली, अहमदनगर) व रहेमुद्दीन महेबूब कुरेशी (वय 29, रा. माजलगाव, ता. बीड, जि. बीड) या तिघांना अटक केली.
शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार कत्तलीला चाललेली जनावरे व गोमांस जप्त केल्याच्या घटना घडत असताना शिक्रापूर येथून सहा हजार किलो गोमांस घेऊन जाणारी तीन वाहने पकडून गोमांस जप्त करीत तिघांना अटक करण्यात आली.
शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावरून अहमदनगरहून पुण्याकडे काही वाहने गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाल्यानंतर ते काही गोरक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षक वैभव स्वामी, पोलिस हवालदार बापू हडागळे, कल्पेश राखोंडे यांच्यासह शिक्रापूर येथील पाबळ चौकात थांबले असताना त्यांना पहाटेच्या सुमारास काही वेळेत एकामागे एक एमएच 16 एवाय 6280, एमएच 14 एचयू 1841 व एमएच 14 एझेड 4251 ही तीन वाहने आल्याचे दिसून आले.
गोरक्षक व पोलिसांनी वाहनचालकांना थांबवत पाहणी केली असता त्यामध्ये गोमांस आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हे गोमांस अहमदनगर जिल्ह्यातून पुणे येथे देण्यासाठी चाललो असल्याचे सांगितले. या वेळी पोलिसांनी आठ लाख रुपये किमतीची तीन वाहने तसेच दहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे तीन हजार किलो गोमांस असा तब्बल अठरा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 27, रा. आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मंगेश लांडगे करीत आहेत.
Tags :

