पोलीस भरती पुढे ढकलली, पुढील आठवड्यात निर्णय, वयोमर्यादा शिथिल होण्याची शक्यता
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर वारंवार टिका होत आहे. या धर्तीवर राज्यात १७ हजार पदांसाठी पोलिस भरती होणार असल्याचे घोषणा राज्य सरकारने केली होती.
मात्र या धर्तीला अचानकपणे स्थगिती देण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून राज्यभरात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु होणार होती. प्रशासकीय कारणास्तव ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे.
पोलीस भरतीची नवीन जाहिरात प्रसिदध करण्यासंबंधीची तारीख लवकरंच कळवण्यात येणार असल्याचे असे पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी सांगितले आहे.
यंदा १७ हजार पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे, यात कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत हे पुढीलप्रमाणे -
अनुसूचित जाती - 1811
अनुसूचित जमाती - 1350
विमुक्त जाती (अ) - 426
भटक्या जमाती (ब) - 374
भटक्या जमाती (क) -473
भटक्या जमाती (ड) - 292
विमुक्त मागास प्रवर्ग - 292
इतर मागास वर्ग - 2926
इडब्लूएस - 1544
खुला - 5468 जागा
एकूण - 14956
राज्य सरकारनं पोलीस भरतीला तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी न करता आपली तयारी कायम ठेवावी, असे आवाहन आज स्थगिती देण्यात आलेली भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकिय कारणास्थव पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे.
मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजन पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा शिथिल करण्यात येऊ शकते.